Posts

एक कँप अाठवणीतला: स्काऊट गाईड १९९६

 एक कँप अाठवणीतला: स्काऊट गाईड १९९६ आमच्या इयत्ता आठवीचा काळ म्हणजे ‍१९९६ असावे. आम्ही स्काऊट चे विद्यार्थी होतो. तेव्हा एक भन्नाट गोष्ट घडली.आमच्या शाऴेने आठवी ते दहावीच्या स्काऊट गाईड यांचा निवासी कॅंप तिन दिवस ठेवला होता. म्हनजे तिन दिवस शाळा नाही फक्त कॅंप व निसर्ग निवास!! तालुकास्तरीय कॅंप असल्याकारणाने अडूऴ ता पाटण येथील क्षेत्रपाल विदयालयाचे देखील विद्यार्थी सहभागी झाले होते. अगदी त्यावेळेसही त्या कॅंपला मुलीदेखील होत्या. अर्थात शाळेविषयी पालकांची विश्वासार्हताही तेवढी द्दढ होती. आजकाल जे समर कॅंप किंवा हिवाळी शिबिरं होतात त्याचा आद्यप्रकारच म्हणा! ! आमचे दोन संघ एकत्र केले होते वनराज व गजराज संघ. प्रमोद , पवन ,उमेश, प्रशांत , किशोर , सतिश, रुपेश असे बरेच मित्र आमच्या संघात होते.  शाळाच निसर्गाच्या सानिध्यात असल्याने रात्री अपरात्री थोडीशी भिती असेलही पण उत्साहाच्या पुढे भिती कोमेजुन गेली होती. तेव्हा बिबट्या वगैरेची भिती नसायची. साधारण टिपिकल त्रिकोणी तंबू उभारायचा त्यावेळी बैल गाठ, सूकर गाठ अशा गाठी स्काऊटमधे शिकवल्या जात त्याचा उपयोग तंबू उभारताना होत असे. त्यात आपले...

मैत्र जीवांचे# शैलेश मोरे

 मैत्र जीवांचे# शैलेश मोरे तो भेटला तेव्हा पूर्वमाहितीनुसार वलयांकित होता. तो दिसला की बाजूला मित्रांचे अन मैत्रिणींचे कोंडाळे! एमेस्सी ला एकाच डिपार्टमेंटला आमचीओळख झाली.आम्ही मूळातच असेच खुशालचेंडू अन सातारचा म्हटल्यावर विषयच संपला.पण तो काहीना काही गोष्टीत प्रसिद्ध होता. मग त्या चाकोरीबाहेरच्या का असेनात. महाराष्ट्रच लोकसेवा आयोगाच्या परिक्षेचा अभ्यास करताना अभी नही तो कभी नही या प्रतिज्ञेवर ठाम. इकडे एमेस्सी लेक्चरला दांडी पडु लागली मात्र महाशय जे होइल ते बघू म्हणत राहुरीतील झाडांच्या सावलीत रट्टा मारत होते. शैलेश मोरे!! होय. कर्मधर्मसंयोगाने त्यांच्या प्रयत्नांना यश आले. देईल ती परिक्षा पास होत,राजपत्रित अधिकारी म्हणून स्थिरस्थावर झाले. त्यांच्या सोबतच्या बर्‍याच आठवणी आहेत.एकदा कॉलेजमधे क्रिकेटच्या नाईट मॅचेस होत्या ,आम्ही एकाच संघात होतो.अर्थात तेच कर्णधार होते.मला गोलंदाजीपण द्यायचे." नीट टाक नायतर कानफडीन" म्हणून दमपण द्यायचे. एकदा एका फलंदाजाने उंच चेंडू फटकावला. आम्ही दोघेपण अंदाज घेत होतो मला समोरुन शैलेश दिसताच मी म्हणालो " (कॅच) तुम्ही घ्या तुम्ही घ्या...

मी जात आहे

 मी जात आहे मी जात आहे . . जायचे म्हणत आहे पण जात नाही मी जात आहे . . . ! !  दोनवेळच्या अन्नाची जरी भ्रांत आहे नसानसांमध्ये भिनलेली मी जात आहे मी जात आहे . ! ! वाटे बहुधा शांत पण अशांत आहे युगायुगांचा मूक मी आकांत आहे‍ मी जात आहे . ! ! कुणी म्हणे हो खालची मी कुणास वाटे वरची अजूनही 'ती'उतरंड पाळली 'जात आहे मी जात आहे . ! !  जनता ही शहाणी सुज्ञ समाज आहे अजूनी धर्म वर्ण पंथाचा माज आहे मी जात आहे.! ! शाहूफुलेआंबेडकर फक्त पुस्तकांत आहे रक्तात अन् काहींच्या मी 'मेंद'वात अाहे मी जात आहे.! !  प्रेरक अन् उत्तेजक माझ्यात आहे विनाशास कारणी ती मी'जात' आहे मी जात आहे! ! !

पैली अंघोळ

 पेैली अंघोळ!! इयत्ता सातवी.पहिली सत्र संपली. आता दिवाळीची सुटी लागणार म्हणून दिनू खूष होता. दिवाळीत गोड धोड मिळणार नवीन कपडे फटाके या कल्पनेतच तो रमत होता.  आईला दिवाळीला नवीन कपडे कधी घ्यायचे म्हणून तो विचारु लागला. " आणतील रं त्येनी नगं काळजी करुस " आई म्हणायची.  "आयं मला फुल पॅंट पाहिजे दादा(वडील)मला सारखं खाकी चड्डी पांढरा शर्टच आणत्यात."दिनू सांगतो. "बरं बरं तीबी नवीनच असत्यात न्हवं" आई म्हनते. "मग घालायची कवा?" दिन्या "पैल्या आंगुळीला" बेस्तरवारी (गुरुवारी)आई. दिन्या पुन्हा खुष व्हायचा. बघता बघता दिवाळी उद्यावर आली. फक्त आजची रात्र मग उद्या मज्जा म्हणत दिनू झोपी गेला. सकाळ झालीय.सगळीकडे फटाक्यांचा आवाज येतोय.शेजारी रांगोळी काढत आहेत. उंबरठयावर दिवे दिसत आहेत. दिनूच्याही अंगावर नवीन कपडे आहेत. त्याची आवडती फुल पॅंट घालून तो मिरवत आहे. दिनूही एक फटाका लावतो ध डा् म्म असा आवाज होतो. अन् दिनूचे स्वप्न तुटते. तांबडं फुटायला वेळ होता. "मालक ओ मालक" म्हणत कुणीतरी आवाज देत होतं" आई बाहेर जाते . एकजण कागदाचं चिटोरं दाखवत म्...

न झालेले आभारप्रदर्शनपर भाषण

 नमस्कार मित्रांनो!! न झालेले आभारप्रदर्शनपर भाषण (अौचित्य शिक्षकदिनाचे म्हणून सादर) क्षात्रभास्कर छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन . . व्यासपीठावरील उपस्थित दिग्गज मान्यवर व ज्येष्ठ कनिष्ठ मित्रांनो सर्वांना या मज पामराचा मनापासून नमस्कार !! समोर पाहिले की सिंहासन चित्रपटानंतर " दिग्गज "शब्दाला आज वास्तवात पहिल्यांदाच न्याय मिळाला.असं मला वाटतय. आजच्या या ह्द्य गुरुगौरव सोहळ्याची तथा माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन सोहळ्याची आभाराची जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे असं म्हणण्यापेक्षा संयोजकांनी ती लादली आहे असं म्हणेन. यातून बाहेर पडायची संधी आली होती एका भल्या सकाळी काही तात्कालिक नियोजनामुळे यातून जवळपास मी मुक्तच झालो होतो.( आज मै ऊपर असंच झालं)पण अचानक संध्याकाळी पुन्हा सचिन नलवडे साहेबांनी धरुन आणले.( आणि मै निचे) झालो. माझ्या कानी कपाळी कुनीतरी ओरडले त्याचा प्रतिध्वनी येऊ लागला" हे तुलाच कराव लागेल." ज्यांच्यापुढे अनेक वर्ष कुठ तरी आडोशाला लपत लपत शाळा कॉलेज शिकलो. त्यांच्यापुढ्यात जाऊन त्यांच्याकडे बघून आभाराचे भाषण करायचे म्हनजे "हे...

माफ करा महाराज!!!

 माफ करा महाराज!!! खरं सांगतो महाराज, लय वाईट वाटलं "कोसळण्याची"बातमी झाली डोळा अश्रूंनी गाठलं रयतेचं राज्य तुम्ही,दिमाखात थाटलं पण मा़झं माझं करुन बारा बलुत्यात वाटलं महाराष्ट्र म्हणे याला,जणू पुरोगामी लेकरं जो तो झाला मालक इथे नाही कुणालाच धाक रं भावांनी बहिणीला इथं,पंधराशे वाटलं लेकीबाळी 'सावज'तिथं नराधमांनी गाठलं अशा नराधमां तुम्ही,न्याय म्हणून छाटलं हाच कायदा पाहिजे असं मनापासून वाटलं प्रगतीच्या मागे धावून,आम्ही "कर्तव्याला" टाकलं कोसळल्याची बातमी झाली राजं काळीजंच फाटलं . . स्वाभिमानी राज्य करता,तुम्ही नाही कधी हरले "राजे' फक्त आमचे म्हणत मावळे नालायक ठरले मावळे नालायक ठरले @सुविकोळेकर

मुकद्दर

 अवरंगजेब : छत्रपतींच्या व स्वराज्याच्या आयुष्यातील 'अ' च्या बाराखडीतील पहिला 'अ' आदिलशाहीचा मग अफजलखानाचा मग. . अ अ आग्रा भेटीचा नंतर 'अ' 'अ 'अवरंगजेबाचा की जो शेवटी अ अ अहमदनगरमधे शांत झाला. अत्यंत महत्वाकांक्षी , धोरणी, निष्णात योध्दा ,राजकारणधुरंदर, नाचगाणं व वैषयिकतेपासून दूर यासोबतच धूर्त ,बेरकी, मतलबी ,स्वार्थी , खुनशी , शंकेखोर,धर्मांध व अहंकारी, असे व्यक्तिमत्त्व अर्थात इतिहासकार त्याचे महत्व नाकारत नाहीत.बालपणीच आजा जहांगीरच्या कैदेत राहाव लागलेला अवरंग व दारा यांना नकळत राजकारणातील सुंदोपसुंदी तिथूनच कळू लागली. नंतरच्या गादीवारस संग्रामात बापाला कैद , भावांची हत्या,मुलांना ,पुतण्याना,सरदारांना कैद कधी खून अरेरे !!. . कमी वयातच कर्तबगारी करुनही मोठ्या भावाला दाराशुकोहला बादशाहीपासून रोखण्यासाठी टोकाचे हिंस्र राजकारण. पुढे दख्खनच्या स्वारीत स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभूराजांवर अनन्वित अत्याचार करुन त्यांची जीवनयात्रा संपवल्याचा आनंद फार काळ टिकला नाहीच. . .पाचपाच लक्ष माणसं तितकीच जनावरे घेऊन दक्खनेत उतरलेल्या बादशाही लवाजम...