माफ करा महाराज!!!
माफ करा महाराज!!!
खरं सांगतो महाराज, लय वाईट वाटलं"कोसळण्याची"बातमी झाली
डोळा अश्रूंनी गाठलं
रयतेचं राज्य तुम्ही,दिमाखात थाटलं
पण मा़झं माझं करुन
बारा बलुत्यात वाटलं
महाराष्ट्र म्हणे याला,जणू पुरोगामी लेकरं
जो तो झाला मालक इथे
नाही कुणालाच धाक रं
भावांनी बहिणीला इथं,पंधराशे वाटलं
लेकीबाळी 'सावज'तिथं
नराधमांनी गाठलं
अशा नराधमां तुम्ही,न्याय म्हणून छाटलं
हाच कायदा पाहिजे
असं मनापासून वाटलं
प्रगतीच्या मागे धावून,आम्ही "कर्तव्याला" टाकलं
कोसळल्याची बातमी झाली
राजं काळीजंच फाटलं . .
स्वाभिमानी राज्य करता,तुम्ही नाही कधी हरले
"राजे' फक्त आमचे म्हणत
मावळे नालायक ठरले
मावळे नालायक ठरले
@सुविकोळेकर
Comments
Post a Comment