न झालेले आभारप्रदर्शनपर भाषण
नमस्कार मित्रांनो!!
न झालेले आभारप्रदर्शनपर भाषण
(अौचित्य शिक्षकदिनाचे म्हणून सादर)
क्षात्रभास्कर छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन . .
व्यासपीठावरील उपस्थित दिग्गज मान्यवर व ज्येष्ठ कनिष्ठ मित्रांनो
सर्वांना या मज पामराचा मनापासून नमस्कार !!
समोर पाहिले की सिंहासन चित्रपटानंतर
" दिग्गज "शब्दाला आज वास्तवात पहिल्यांदाच न्याय मिळाला.असं मला वाटतय.
आजच्या या ह्द्य गुरुगौरव सोहळ्याची तथा माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन सोहळ्याची आभाराची जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे असं म्हणण्यापेक्षा
संयोजकांनी ती लादली आहे असं म्हणेन. यातून बाहेर पडायची संधी आली होती एका भल्या सकाळी काही तात्कालिक नियोजनामुळे यातून जवळपास मी मुक्तच झालो होतो.( आज मै ऊपर असंच झालं)पण अचानक संध्याकाळी पुन्हा सचिन नलवडे साहेबांनी धरुन आणले.( आणि मै निचे) झालो.
माझ्या कानी कपाळी कुनीतरी ओरडले त्याचा प्रतिध्वनी येऊ लागला" हे तुलाच कराव लागेल."
ज्यांच्यापुढे अनेक वर्ष कुठ तरी आडोशाला लपत लपत शाळा कॉलेज शिकलो. त्यांच्यापुढ्यात जाऊन त्यांच्याकडे बघून आभाराचे भाषण करायचे म्हनजे
"हे येरागबाळ्यावे काम नाही"
ज्यांच्या हाताखाली आम्ही घडलो. . .
त्यांच्याबद्दल सांगाव ते कमीच!!
काही दिवसांआधी मला "कामावर जायला उशिर झाला."
आमच्या शाखाप्रबंधक गोमंतकीय अस्खलित इंग्रजीत बोलायच्या . . . . .
" कोलेकर वाय आर यु लेट"
आव मैडम घरातन वेळेतच निघालो पण वाटेमधे ट्राफिक जाम झालं म्हऩून उशिर झाला
ओके टेल मी इन इंग्लीश
" अॅक्चुली आय एम इन टायम फ्रॉम होम
बट ड्यु टू हेवी ट्राफिक आय गॉट लेट.
by the way where did u learn english??
मी म्हणालो
गांधीटेकडी के.व्ही पाटील" द ब्रँड . . "
जसं की
you come तू ये .
then see मग बघ
i will beat . . फोडतो कसा ते
इतक बाळबोध मराठी जगाच्या पाठीवर कुणीच शिकवत नसावं. . . " इंग्लंडच्या एखाद्या कुणी सरांना इतकं मुद्देसूद शिकवताना पाहिलं असतं तर तो मराठी शिकला असता. .
म्हनूनच म्हणतो.
पाटील सर. .
तुमचं इंग्रजी आमच्या मनात
आम्ही कायम तुमच्या ऋणात
त्यांचा मार ,वाया जाणारे सुधरणे, वगैरे हा एक वेगळा विषय आहे.
गनिताचे भीष्माचार्य यादव बी.टी.ए.टी.डी.
मिलीसेंटी डेसी मिटर डेका हेक्टो किलो
चक्क गाणाच्या तालावर ही एकक शिकविली.
कायम मनात कोरली.
देसाई बाईंनी एक समीकरण शिकवलं समीकरणाचं उत्तर आलं शून्य. मी म्हणालो शुन्याला किमत नसते.
बाईंनी १०अंक फळ्यावर लिहला व एक शून्य वाढवला व विचारले झाली का किंमत कमी. . . ?
हा प्रसंग इतका मनावर कोरला की. . .
बँकेत कामाला लागलो तेव्हा . . पहिलीच फाईलमंजुरीला आली . . दीड करोडची.
मला आमचे वरिष्ठ म्हणाले फाईलवर नाव व रक्कम लिहा.
मला प्रश्न. . . . आता दीड करोडवर शून्य किती लिहावे
त्यांना माझी परिक्षा घ्य़ायची असावी.
मग मीही शून्यांचा घोळ नको म्हणून
" मराठीत "एस. बी . पाटणकर" दीड कोटी असं लिहलं व वेळ मारुन नेली.
वरिष्ठ खो खो हसायला लागले.
तेव्हा तुमचं
बाईंच. .
गणित आमच्या मनात आम्ही कायम तुमच्या ऋणात.
हिंदी .
शिकवणारी . मुलाणी दांपत्य कमालीची सहिष्णु माणसं.शब्दांपलीकडे यांच काम आहे.शास्त्रशुध्द हिंदी शिकणारे. . विद्यार्थिप्रिय शिक्षक पतीपत्नी.
सोबतच. .
. .
महाराजा शिवाजी ने अफजलखान को मारा.
असे म्हणणारे व फक्त राजांचा एकेरी वाटनारा उल्लेख टाळणारे
नलावडे सर विरळाच! !
तुमचं हिंदी . . . . .आमच्या मनात . .आम्ही नेहमी तुमच्या ऋणात. .
इतिहास .
कै.बी.व्ही शिंदे सर जबरदस्त विनापुस्तक शिकवणार
पहिलं अन दुसर महायुध्द असं शिकवायचे जणू आपण युरोपात आहोत असं वाटायचं.
मधेच जित व जेते राष्टांचे प्रश्न विचारुन भंबेरी उडवून द्यायचे.अन् पाठीत जोरदार रपाटा द्यायचे वर्गात आवाज घुमायचा"" धम्म . ."
त्यांच शिकवण आमच्या मनात . .आम्ही नेहमी तुमच्या ऋणात. .
मराठी एस एस पवार बाई . .नको देवराया अंत आता पाहू प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. . . लाजवाब शिकवायच्या .
संगीत शिक्षक पाटील बी डी सर . .
सा ध पध मप गमप मपधनिसा . . . ग्रेटच!!!
खरंतर आभारप्रदर्शन माझ्या माहितीप्रमाणे सदर कार्यक्रमास "अ पासून ज्ञ पर्यंत "प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहकार्य केलेल्या गुणीजनांचे करतात असा ठोकळ नियम आहे किंवा असावा
माझा अशा अघोषित नियमांना आक्षेप आहे आभाराचे प्रदर्शन कसले करता. आभार ही 'संयत' भावना आहे जर कुणी सात्विक भावनेने आपणांस सत्कार्य व सहकार्य करत असेल तर त्याच्या ऋणात आयुष्यभर राहावं .फार फारतर ऋणनिर्देश म्हणू हवं तर.(पुणेरी वाटावं असं)
या कार्यक्रमास अशा उच्च कोटीच्या व बुध्दीजीवी गुरुजनांना एकत्र आणून त्यांचा थोडक्यात जीवन गौरव करण्याची कल्पना ज्यांनी मांडली त्या डॉक्टर स्वाती ताईं शिंदेचे.
बरं, कल्पना कुणीही करतं तिला प्रत्यक्षात आणायचं शिवधनुष्य सगळ्यानाच पेलंत असं नाही.
इथं
नावं कुणांचही घेऊ नका अशी सूचना सचिन नलावडे सर , क्रृष्णत पाटील शंकर नांगरे सर नीलम घाडगे वंदना काळुगडे मॅडम गणेश देशमुख यांनी सांगितले होते.
पण" नामाशिवाय" कर्ता व कर्माला काहीही महत्व नाही.
असं मराठी व्याकरणात आपल्याला वाठारकर सर व पवार बाईंनी शिकवलंय.
कार्यक्रमास अनेक विद्यार्थी मित्र मैत्रिणी गावागावांतून कोकण पुणे मुंबई देशभरातून किंबहुणा जगभरातून हजर राहिलेत (आबा पाटील द.आफ्रकेला असतात) सुरेंद्र गुरवही बाहेर असतात.
अर्थात जे हजर राहिलेत म्हणजे ते" रिकामटेकडे "आहेत असं नाही.
"शाळा" या दोन अक्षरांविषयी ज्यांच्या मनात अजूनही श्रध्दा आहे त्यांनी यासाठीच वेळ काढून उपस्थिती दर्शवली आहे. अनेक जण कार्यबाहुल्यामुळे किंवा अन्य व्यस्त पूर्वनियोजनामुळे येऊ शकले नाहीत ते भविष्यात निश्चीतच येतील.
आता कार्यक्रमास आलेले.
प्रमुख मान्यवर
आदरणीय नायकवडी सर . .
मला माहित असलेले मारुल ह.चे पहिले लेखक
शिक्षक व्रृंद व शिक्षकेतर कर्मचारी.
यांची यादी दिली आहेच.तरीही
आवर्जून नावं घ्याव म्हटलं तर तेवढा वेळ नाही.
पण इथ वार्धक्यास विसरलेले अनेक द्रोणाचार्य
आपल्या पांडवासम शिष्यांस भेटायला आलेत
त्यांना मनापासून धन्यवाद !!
हॉल व इतर पूरक गोष्टी उपलब्ध करुन दिल्याबद्दल शाळाप्रशासनाचे मनापासून धन्यवाद
मुख्याध्यापक शिक्षकव्रृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे धन्यवाद .
१)फोटोग्राफी व इतर नियोजन यशराज फोटोज नवारस्ता
२) सुग्रास भोजन: उमेश हिरवे कुटुंबियांचे मनापासून धन्यवाद .! ! ! ! !
असो परिक्षेची तयारी तर केली पण. . परिक्षाच झाली नाही. . .
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
Comments
Post a Comment