शेतकर्यांची पोरं उत्तरार्ध भाग सोळा .
झाल्या प्रकारामुळे शंतनुचे मन खट्टू झाले होते. त्याच्या समोर एकच प्रश्न होता.कसंही करुन गाडीची कागदपत्रं मिळवायची. घरी सांगून शंतनुस दंड भरण्यास पैसे मिळालेपण असते पण आईच्या रागास सामोरं जाण शंतनुला शक्य नव्हते. तसेच बाबांचा मग विषयच वेगळा. काय करावे हे त्या तंद्रीत तो नितीनच्या घरी जातो. नितीन घरातच सापडतो. अर्थात नितीन दबक्या पावलांनी बाहेर येतो. दोघांची चर्चा सुरु होते. " उद्या आपण जाऊ पुलिस्टेशनला नितीन बोलून जातो" पण दंड?? शंतनु विचारतो. "बघू फुडचं फुडं "नितीन सांगतो. शंतनु मान डोलावतो.निघून जातो. (नितीन मनात म्हणतो " झक मारली अन् गाडी काढली") दुसर्या दिवशी नितीन व शंतनु शहर पोलिस स्टेशनला जातात. इकडंतिकडं बघत असतात. बरेच लोक काहीनाकाही कुजबुज करत होते.एखाद्या पोलिसासोबत बोलत उभे होते .कुणी विनंती करत होते. काहीजण एखाद्या खाकीवाल्याची मखलाशी करत होते. पण त्यांना हवा तो पोलिस तिथे नव्हता. शंतनु सुचवतो. अरे नितीन ट्रॅफिकवाले कुठे असतात ते विचाराव लागेल. नितीन भुवया उंचावून संमतिदर्शक मान हलवतो. तिथे जवळच पेपर वाचत बसलेल्या खाकीतील वय...