जोडोनिया धन . .
जोडोनिया धन . . . पैसा नेहमी येतो जातो गुंतवत नाही कोणी नोटा सार्या खर्चुनी जाती उरतात फक्त नाणी . . भोगवाद हा पसरला सारा बचतीला ना देई थारा चंगळवादाकडे दुनिया जाई ढगाविना ही फुले पिसारा पगार'जमे'चा मेसेज येई देणेकऱ्यांतच संपून जाई जाणार कसा हा महिना आता क्रेडिट कार्ड मग कामी येई क्रेडिट कार्डचा हा सोसही न्यारा दीड महिण्याचा खेळ हा सारा त्याचे पेमेंट भरता भरता जीव हा होई आरा रारा विनाकारणे औटींग होई खाण्यापिण्याला स्विगीताई सोडावे ते ब्रँडेड जगणे गाव बरा अन् भाजी भाकरी अर्थज्ञान हे कधी न समजे मर्म तयाचे कधी न उमजे जोडोनिया धन उत्तम व्यवहारे संतवाणीची कास धरु संतवाणीची कास धरु सुविकोळेकर@