मी जात आहे
मी जात आहे मी जात आहे . .
जायचे म्हणत आहे पण जात नाही
मी जात आहे . . . ! !
दोनवेळच्या अन्नाची जरी भ्रांत आहे
नसानसांमध्ये भिनलेली मी जात आहे
मी जात आहे . ! !
वाटे बहुधा शांत पण अशांत आहे
युगायुगांचा मूक मी आकांत आहे
मी जात आहे . ! !
कुणी म्हणे हो खालची मी कुणास वाटे वरची
अजूनही 'ती'उतरंड पाळली 'जात आहे
मी जात आहे . ! !
जनता ही शहाणी सुज्ञ समाज आहे
अजूनी धर्म वर्ण पंथाचा माज आहे
मी जात आहे.! !
शाहूफुलेआंबेडकर फक्त पुस्तकांत आहे
रक्तात अन् काहींच्या मी 'मेंद'वात अाहे
मी जात आहे.! !
प्रेरक अन् उत्तेजक माझ्यात आहे
विनाशास कारणी ती मी'जात' आहे
मी जात आहे! ! !
Comments
Post a Comment