Posts

Showing posts from October, 2024

पैली अंघोळ

 पेैली अंघोळ!! इयत्ता सातवी.पहिली सत्र संपली. आता दिवाळीची सुटी लागणार म्हणून दिनू खूष होता. दिवाळीत गोड धोड मिळणार नवीन कपडे फटाके या कल्पनेतच तो रमत होता.  आईला दिवाळीला नवीन कपडे कधी घ्यायचे म्हणून तो विचारु लागला. " आणतील रं त्येनी नगं काळजी करुस " आई म्हणायची.  "आयं मला फुल पॅंट पाहिजे दादा(वडील)मला सारखं खाकी चड्डी पांढरा शर्टच आणत्यात."दिनू सांगतो. "बरं बरं तीबी नवीनच असत्यात न्हवं" आई म्हनते. "मग घालायची कवा?" दिन्या "पैल्या आंगुळीला" बेस्तरवारी (गुरुवारी)आई. दिन्या पुन्हा खुष व्हायचा. बघता बघता दिवाळी उद्यावर आली. फक्त आजची रात्र मग उद्या मज्जा म्हणत दिनू झोपी गेला. सकाळ झालीय.सगळीकडे फटाक्यांचा आवाज येतोय.शेजारी रांगोळी काढत आहेत. उंबरठयावर दिवे दिसत आहेत. दिनूच्याही अंगावर नवीन कपडे आहेत. त्याची आवडती फुल पॅंट घालून तो मिरवत आहे. दिनूही एक फटाका लावतो ध डा् म्म असा आवाज होतो. अन् दिनूचे स्वप्न तुटते. तांबडं फुटायला वेळ होता. "मालक ओ मालक" म्हणत कुणीतरी आवाज देत होतं" आई बाहेर जाते . एकजण कागदाचं चिटोरं दाखवत म्...