पिंट्या: एक मैत्र
पिंट्या: इयत्ता पाचवीपासून ते दहावीपर्यंत सोबत असलेला आमचा एक मित्र. हुषार असा की त्यास कोणत्याही गोष्टीची उजळणी लागत नसे.वर्गात शिकवलेल्या पाठावर तो परिक्षा देऊ शकायचा.त्यावेळेस मुलामुलींच्यात चाचणी किंवा सहामाही परिक्षेत कुणाल किती गुण पडलेत याविषयी कुतूहल मिश्रीत ईर्षा असायची. एकमेव असा पिंट्या असायचा की त्याच्याजवळपासही कुणी नसायचो. म्हणजे त्याला ९६ गुण मिळाले तर आम्ही ६९ असायचो पण त्याला त्याचा गर्व कधी नसायचा. बर्याच वेळा तो वर्गाचा मॉनिटर असायचा. तो समजूतदार व सर्वमान्य असल्याने(आमच्यासारखी) टुकार मुलंही त्यावेळेस दंगा करत नसत.आमच्या सर्वांच्यात उंच व मजबूत असल्याने कबड्डीतही तो असायचाच. खेळाशी अतिशय प्रामाणिक व न चीडता कबड्डी खेळायचा.खुन्नस वगैरे असला प्रकार त्याच्या मनात नसायचा. कबड्डीची एंट्री करतानाही अतिशय निरागस व सात्विक पद्धतीने अपारंपारिक चाल करायचा. स्कॉलरशीप किंवा त त्सम स्पर्धा परिक्षा तो हसत हसत पार करायचा. आमचे गणिताचे शिक्षक तर उदाहरण दिल्यानंतर सोडवून झाल्यानंतर "त्यालाच " विचारायचे"नांगरे बरोबर ना" यावर तो किंचीत हसत मान हलवायचा. गणित ...