एक कँप अाठवणीतला: स्काऊट गाईड १९९६
एक कँप अाठवणीतला: स्काऊट गाईड १९९६ आमच्या इयत्ता आठवीचा काळ म्हणजे १९९६ असावे. आम्ही स्काऊट चे विद्यार्थी होतो. तेव्हा एक भन्नाट गोष्ट घडली.आमच्या शाऴेने आठवी ते दहावीच्या स्काऊट गाईड यांचा निवासी कॅंप तिन दिवस ठेवला होता. म्हनजे तिन दिवस शाळा नाही फक्त कॅंप व निसर्ग निवास!! तालुकास्तरीय कॅंप असल्याकारणाने अडूऴ ता पाटण येथील क्षेत्रपाल विदयालयाचे देखील विद्यार्थी सहभागी झाले होते. अगदी त्यावेळेसही त्या कॅंपला मुलीदेखील होत्या. अर्थात शाळेविषयी पालकांची विश्वासार्हताही तेवढी द्दढ होती. आजकाल जे समर कॅंप किंवा हिवाळी शिबिरं होतात त्याचा आद्यप्रकारच म्हणा! ! आमचे दोन संघ एकत्र केले होते वनराज व गजराज संघ. प्रमोद , पवन ,उमेश, प्रशांत , किशोर , सतिश, रुपेश असे बरेच मित्र आमच्या संघात होते. शाळाच निसर्गाच्या सानिध्यात असल्याने रात्री अपरात्री थोडीशी भिती असेलही पण उत्साहाच्या पुढे भिती कोमेजुन गेली होती. तेव्हा बिबट्या वगैरेची भिती नसायची. साधारण टिपिकल त्रिकोणी तंबू उभारायचा त्यावेळी बैल गाठ, सूकर गाठ अशा गाठी स्काऊटमधे शिकवल्या जात त्याचा उपयोग तंबू उभारताना होत असे. त्यात आपले...