Posts

Showing posts from July, 2024

एक तोचि मल्हार . . !

 एक तोचि मल्हार ! ! छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या पुढच्या पिढीचे ध्वजवाहक आणि पेशवाईत तावून सुलाखुन निघालेले निडर व निबर व्यक्तिमत्त्व म्हणजे मल्हारराव होळकर.बाळाजी विश्वनाथ नंतर थोरले बाजीराव तदनंतर पेशवे नानासाहेब व नंतर माधवराव पेशवे अशा चारही पेशव्यांच्या कारकिर्दीत मैदान गाजवलेला भीष्मच जणू!! पहिल्या बाजीरावांचा सार्थ साथीदार. राघोभरारीत उत्तरविजयानंतर अशा स्वारीमुळे उत्पन्न मिळावयाचे राहून जवळपास पाऊणकोट कर्ज झाले.अर्थात दफ्तरी सांभाळणारे भाऊसाहेबांनी यावर " मग " अशा स्वार्‍या काय कामाच्या " म्हणून आक्षेप घेतला व यावर "मोठ्या स्वार्‍या जिंकायच्या म्हटल्या की जास्तीची फौज लागते, इथूनपुढे मुलुखगिरी तुम्हीच करत जा" दफ्तरी आम्ही बघू " म्हणत रघुनाथराव पेशव्यांनी नाराजी व्यक्त केली. इथे भाऊसाहेबांनी घरबंधू राघोबांची ही अवस्था केली तर इतर सरदारांची खैरच केली जाणार नाही अस मत पडलं. मात्र जेव्हा मल्हारबाबांची ,श्रीमंतांशी व भाऊसाहेबांची भेट होते तेव्हांचा गंभीर प्रसंग असा की मल्हार राव विचारतात " भाऊसाहेब तुम्हांस शपथ आहे एकंदर दौलतीवर कर्ज क...

फडनवीस ते फडनवीस :

 फडनवीस ते फडनवीस : उत्तर पेशवाईत (पानीपतानंतर) मराठेशाहीतअनेक मुत्सद्दी होऊन गेले.ज्यांनी छत्रपतींचा भगवा फडकत ठेवला.तशी पानीपतानंतरची हानी पेशवे माधवरावांच्या काळात भरुन निघाली महादजी शिंद्यानी उत्तरेत जाऊन नजीबखानाची कबर उध्वस्त केली.कर्तबगार माधवराव लवकरच निर्वतले.मग त्यांचे धाकटे बंधू नारायणरावांना पेशवेपदावर आणले.जे की रघुनाथराव पेशवे (थोरल्या बाजीरावांचे दुसरे पुत्र) रुचत नव्हते. मग कारस्थानी आनंदीबाई-रघुनाथ दांपत्याने ध चा मा करुन पुतण्या नारायणरावांचा वध करविला. त्या न्यायदानात रामशास्त्री प्रभुण्यांनी रघुनाथरावांना देहांत प्रायश्चित्त सांगूनही, रघुनाथरावांनी अतिउत्साहात सातारच्या छत्रपतींकडून पेशवाईची वस्त्रे आणून पेशवेपदी बसलेही(पुणेकरांना ते रुचले नव्हते) व नानांच्या नाड्या आवळ ल्या. धोरणी नानांनीही नमते घेतले. आनंदीबाई तर" मी मिरवणार समद्यांची जिरवणार" अशाच अविर्भावात होत्या. अशातच नारायणरावांच्या गर्भार पत्नी गंगाबाईंवर तो नारायणरावांचा वंश खुडण्याचा असफल प्रयत्न अानंदीबाईंनी केला. . . .मोरोबा दादा फडणवीस हे त्यांचे बंधू पक्के राघोबादादंचे समर्थक यां...