मुकद्दर

 अवरंगजेब :


छत्रपतींच्या व स्वराज्याच्या आयुष्यातील 'अ' च्या बाराखडीतील पहिला
'अ' आदिलशाहीचा
मग अफजलखानाचा
मग. .
अ अ आग्रा भेटीचा
नंतर 'अ' 'अ 'अवरंगजेबाचा
की जो शेवटी
अ अ अहमदनगरमधे शांत झाला.
अत्यंत महत्वाकांक्षी , धोरणी, निष्णात योध्दा ,राजकारणधुरंदर, नाचगाणं व वैषयिकतेपासून दूर यासोबतच धूर्त ,बेरकी, मतलबी ,स्वार्थी , खुनशी , शंकेखोर,धर्मांध व अहंकारी, असे व्यक्तिमत्त्व अर्थात इतिहासकार त्याचे महत्व नाकारत नाहीत.बालपणीच आजा जहांगीरच्या कैदेत राहाव लागलेला अवरंग व दारा यांना नकळत राजकारणातील सुंदोपसुंदी तिथूनच कळू लागली.
नंतरच्या गादीवारस संग्रामात बापाला कैद , भावांची हत्या,मुलांना ,पुतण्याना,सरदारांना कैद कधी खून अरेरे !!. .
कमी वयातच कर्तबगारी करुनही मोठ्या भावाला दाराशुकोहला बादशाहीपासून रोखण्यासाठी टोकाचे हिंस्र राजकारण.
पुढे दख्खनच्या स्वारीत स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभूराजांवर अनन्वित अत्याचार करुन त्यांची जीवनयात्रा संपवल्याचा आनंद फार काळ टिकला नाहीच. . .पाचपाच लक्ष माणसं तितकीच जनावरे घेऊन दक्खनेत उतरलेल्या बादशाही लवाजम्याची कुत्रेहोलपट मराठी सैन्याने केली.
इथले डोंगर पाऊस अन् इथला मरहट्टा . . जन्माचे वैरी वाटू लागले. . .
अन् इच्छेविरुद्ध आणलेली सेना ही मनापासून लढत नाही . हे पाहून "गप बसेल ते म्हातारं कुठलं" . . .
हा ऐंशीतला तरुण बादशाह उगाच युयुत्सु भाषणं देऊन , तलवारी नाचवून , धर्म‍ाच्या नावाखाली सेैन्यास चेतवू पहायचा पण उयोगशून्यच . .जे काही किल्ले जिंकले ते त्यांच्या सरदारांनी "मॅनेज" करुन जिंकले . . हेही त्यास ठावे होते
अवरंग्याचा अहंकार तिथेच ठेचला गेला.

अर्थात "मुकद्दर "कथा औरंगजेबाची हे लेखक स्वप्निलजी रामदास कोलते यांचे वाचनीय पुस्तक आहे . अर्थात अवरंग्याला मोठा करण्याचा हा यत्न नव्हेच. पुस्तक नक्की वाचा कारण जितका अवरंग आपणाला समजत जाईल तस तसं आपल्या रयतेच्या राजांच छत्रपतींचं " देवत्व "आपणांस कळत जाईल . .

स्वप्निलजी खूप खूप धन्यवाद!!!

"मुकद्दर "कथा औरंगजेबाची
लेखक : स्वप्निलजी रामदास कोलते
न्यु ईरा पब्लिकेशन हाऊस



सुविकोळेकर

Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीर सावरकर

मैत्र जीवांचे# शैलेश मोरे

एक कँप अाठवणीतला: स्काऊट गाईड १९९६