Posts

Showing posts from February, 2023

गारेगार

  गारेगार . . . साधारण १९८९ ते १९९२ चा काळ असावा. आताच्या काळासारखी संपन्नता होती अशी नाही किंवा नव्हतीही. त्यातच आमचा पहिली ते चौथीचा कालावधी असावा. बालवाडीचा वर्ग जोतिबाच्या देवळात (कुलकर्णी बाई) इतर वर्ग मारुतिच्या देवळात व नंतर काही दिवसांत "जीवन शिक्षण विद्यामंदीर "मराठी शाळेत. तशीही शिकायला कमी पण रानामाळात राबनार्‍या कष्टकऱ्यांना दिवसभर मुलं "पार्क" करायचे हक्काच ठिकाण. डब्यात भाकरीभाजी देऊन आयामाऊली रान जवळ करायच्या.डब्यात बहुधा अंडयाची पोळी (ऑम्लेट) असेल तर देवळातल्या वर्गात मांसाहारी( नॉनव्हेज) वाले (आयसोेलेट) केले जायचे. आम्ही कायम व्हरांड्यात आयसोलेशन मधे असायचो. साधारण दुसरीच्या वर्गात असू दुपारच्या सुट्टीत हुंदडायला (बोंबलत)शाळेबाहेर यायचो.बाजारपेठेच्या तळावर येऊन इनमिन तिन पानपट्यात डोकावायचो.आंबे विकनार्‍या एका आज्जींपाशी जाऊन उगाच आंब्याची लाल पिवळा बुलांग अशी स्तुती करायचो.लक्ष चुकवून आंबा उचलून पळायचो.अन् दुसर्‍या दिवशीही निरागस निर्लज्जपणे पुन्हा तिच्यापाशी पुन्हा जाऊन बसायचो. कहर म्हणजे आजी स्वता:हून एकेक आंबा हातावर टेकवायची." पोरानू...

झारीतील शुक्राचार्य

 झारीतील शुक्राचार्य !! जिथे "भासतो"आपलेपणा तिथं आपलीच मारली जाते. जिथे " कळतो" अंत:स्थ हेतू तिथं आपलीच मारली जाते. तू जारे " मी " आहेना, तिथं आपलीच मारली जाते. "तूझ्यामूळं हे शक्य झालं" तेव्हा आपलीच मारलेली असते "जे होतं ते चांगल्यासाठीच असते." तेव्हा आपलीच मारलेली असते. "हे काय जस्ट तुलाच फोन करत होतो." तिथं आपलीच मारलेली असते. "तुझा काहीच प्रॉब्लेम नाही रे" तेव्हा आपलीच मारलेली असते. तू बिनधास्त जा मी बोल्लोय तिकडे तेव्हा आपलीच मारलेली असते. जीवनी येईल तेव्हाच स्थैर्य ओळखा 'झारीतील शुक्राचार्य ' ओळखा 'झारीतील शुक्राचार्य ' सुविकोळेकर

शेतकर्‍यांची पोरं उत्तरार्ध भाग नऊ

 शेतकर्‍यांची पोरं उत्तरार्ध : भाग नऊ https://suhaskolekar1010.blogspot.com/2023/02/blog-post.html क्लासरूम पूर्ण भरली होती. नितीनला वेळेत पोहोचल्याच बरं वाटलं.वर्गात प्राध्यापिका आल्या त्यांनी शिकविण्यास सुरुवात केली. बायोलॉजी नितीन लक्ष देऊन ऐकत होता.हिरव्या (ग्रीन)बोर्डवर मॅडम इंग्रजी थर्ड लिपीमधे झरझर लिहायच्या , मुलं कळो न कळो पटपट उतरुन काढायची. मॅडम मधूनच वर्गातून फेरी मारत मारत शिकवत असत. अचानक त्यांच लक्ष एका ठिकाणी गेलं. "हे कुणाचं आहे " मॅडम विचारतात. नितीन बावरुन हळुच म्हणतो. " आमचं आहे" काय आहे त्यात? मॅडम विचारतात. " शेंगा अन् तागडी(तराजू) हाय म्याडम" शेंगा इकायला आणल्या हुत्या थोड्या राहिल्यात." नितीन सरळ सांगतो. वर्गात उगाच हशा पिकला. "अरे ते बाहेर ठेवायचं इथं ओंगळवाणं दिसतंय ते " मॅडम बोलतात. वर्गातील मुलं हसू लागतात. मुलीही फिदीफिदी करतात. नित्याचं मन खट्टू होतं. नाराज नितीन खालमानेनेच बोलतो. " ओंगळवाणी आसली तरी ' जबाबदारी' आहे ती कुठंबी टाकून नाय चालत म्हनून ठेवलीय इथं" बाईंना त्याच्य...