शेतकर्यांची पोरं उत्तरार्ध :भाग दहा
शेतकर्यांची पोरं उत्तरार्ध भाग :दहा रेणू आपल्या अभ्यासात मग्न असताना केतन उगाच तिच्या पुस्तकांत डोकावतो. "काय रेणुमॅडम काय म्हणतंय तुमचं सायन्स कॉलेज " . रेणूला आपल्या भावाचा टोमणा समजून लगेच म्हणाली "अभ्यास करा अन् भविष्य घडवा ,कलांच्या आहारी जाऊ नका." केतनही हसत हसत तिला उत्तरतो. " होय आम्ही आहोत कलोपासक " एखादा पेपर सोपा जावा म्हणून ज्या गणरायाला तू साकडं घालतेस ते गणराज चौसष्ट कलांचे अधिपती आहेत." त्यांचेच आम्ही कलोपासक भक्त आहोत. बाकी तुझं सायन्स वगैरे सगळं थोतांड आहे थोतांड" यावर रेणू भुवया ताणत तोंडाचा आ . . वासून म्हणते. " क्काय थोतांड" ? रेणू ओरडतेच "मग काय सांग बरं ?" केतन विचारतो. रेणू कपाळावर आठ्या गोळा करत सांगायचा यत्न सुरु करते. " सायन्स मिन्स इट डील्स विथ द स्टडी ऑफ नॉलेज. . . . . ." "राहुदे राहुदे हुषार पंडित " केतन तिला मधेच थांबवतो तू सांग ना रे मग केतन पंडित" केतन तिच्याकडे बघत. हातात असनारा चेंडू फिरवत बॉलिंग टाकण्याची एक्शन करत बोलतो " सायन्स इज नथ...