एक मैतर : " स्प्रृहनीय "
एक मैतर : " स्प्रृहनीय " त्याची अन् माझी ओळख इयत्ता दुसरीत असतानाची.तो आपल्या मामाकडे शाळेला आलेला होता( पूर्वी तशी प्रथा पद्धत होती) त्याचे गाव म्ह्मणजे सह्याद्रीच्या मोरगिरी खोर्यात एका पूर्वपश्चिम डोंगर रांगेच्या उत्तरेकडील तीव्र उतारावरील कुसरुंड गाव !समोरुनच वाहणारी मोरणा नदी! निसर्गाची मुक्तहस्ते उधळण असलेला परिसर. त्याच नाव संदीप. आमच्या शब्दशः महान अशा "जीवन शिक्षण विद्यामंदीर " जि.प.च्या शाळेत दुपारच्या सुट्टीत आम्ही गोट्या (आयरे, गैरं) खेळायच्या नादात शाळेत उशिरा पोहोचायचो. बाईंनी विचारताच. " जळण आणायला गेलो होतो."असं खोटंच सांगायचो. बाईंनी मला विचारताच संदीप म्हणायचा " त्योबी माझ्याबरबर आला हुता असं खोटं सांगायचा.अर्थात छड्या मिळायच्याच. जसजसं वय वाढत होतं तसा संदीप प्रगल्भ होत होता. प्रचंड कष्टाची सवय. सुटीच्या दिवशी गुरं चरायला जात असू त्यावेळी एखादं अभ्यासाचं पुस्तक हमखास जवळ असणार. वास्तव परिस्थितीची दाहक जाणीव असणारा. दणकट शरिरयष्टी! तो कबड्डी उत्तम खेळायचा.क्रिकेटही दमदार खेळायचा. निखळ विनोदी असणारा तो नंतरनंतर काहीसा मितभ...