न झालेले आभारप्रदर्शनपर भाषण
न झालेले आभारप्रदर्शनपर भाषण क्षात्रभास्कर छत्रपती थोेरले शिवाजी महाराज यांना वंदन . . व्यासपीठावरील उपस्थित दिग्गज मान्यवर व ज्येष्ठ कनिष्ठ मित्रांनो सर्वांना या मज पामराचा मनापासून नमस्कार !! समोर पाहिले की सिंहासन चित्रपटानंतर " दिग्गज "शब्दाला आज वास्तवात पहिल्यांदाच न्याय मिळाला.असं मला वाट तय. आजच्या या ह्द्य गुरुगौरव सोहळ्याची आभाराची जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे असं म्हणण्यापेक्षा संयोजकांनी ती लादली आहे असं म्हणेण. यातून बाहेर पडायची संधी आली होती एका भल्या सकाळी काही तात्कालिक नियोजनामुळे यातून जवळपास मी मुक्तच झालो होतो.( आज मै ऊपर असंच झालं)पण अचानक संध्याकाळी पुन्हा सचिन नलवडे साहेबांनी धरुन आणले.( आणि मै निचे) माझ्या कानी कपाळी कुनीतरी ओरडले त्याचा प्रतिध्वनी येऊ लागला" हे तुलाच कराव लागेल." ज्यांच्यापुढे अनेक वर्ष कुठ तरी आडोशाला लपत लपत शाळा कॉलेज शिकलो. त्यांच्यापुढ्यात जाऊन त्यांच्याकडे बघून आभाराचे भाषण करायचे म्हनजे "हे येरागबाळ्यावे काम नाही" ज्यांच्या हाताखाली आम्ही घडलो. . . काही दिवसांआधी कामावर जायला उशिर...