Posts

Showing posts from April, 2023

शेतकर्‍यांची पोरं : उत्तरार्ध भाग बारा:

 शेतकर्‍यांची पोरं : उत्तरार्ध भाग बारा: सरकारी दवाखान्यात बानुगडेंना दाखल करतात. " डाक्टर म्हातारं जगलं पायजेल" इनामदार अवसान आणून म्हणतात. डॉक्टर विचारतात ' ते' किरडू आणलंय काय? (धरुन किंवा मारुन) सगळे चक्रावतात. एकजण म्हणतो. " ती काय कुंबडी हाय व्हय धरायला" डॉक्टर पुन्हा सांगतात " जर खरंच सर्पदंश असेल अनं साप कोणत्या जातीचा आहे हे कळलं तर उपचारांची योग्य दिशा ठरवता येते." "तिथं आश्शील . . . जनावर हाय बघा ,केसं हायती त्याच्या अंगावर त्योच असंल" कोणतरी बोलतं नित्या म्हणतो "ऐ तुमी बघितलंय का नक्की नाहीतर उगीच ते जनावर भांग पाडून (केस विंचरुन)आलं हुतं अन् चावलं म्हणून सांगु नका" साधारण सगळे हसतात.डॉक्टरही हसतात. पण कुणाला काही सांगता येत नाही . डॉक्टर लगेच वॉर्डमधे निघतात. इनामदार ज्येष्ठ म्हणून तिथेच थांबतात.बाकीचे लोक इतरत्र बारगळतात. नित्या तिथेच उभा असतो. इनामदाराकडं बघत म्हणतो " "काका जगल का वं म्हातारं?" इनामदार मिशावर उगीच हात फिरवत " शंभर टक्के जगनार " लगेच इनामदारांचा एक खुशमस...

शेतकर्‍यांची पोरं उत्तरार्ध :भाग अकरा

  शेतकर्‍यांची पोरं उत्तरार्ध भाग अकरा: दुसर्‍या दिवशी : कॉलेजमधे " नाही रे पण मला खरंच वाटत नाही की केतन दादा ने ते नोटीस बोर्डवर लिहलं असेल म्हणून" रेणू सांगते. यावर शंतनु म्हणतो "जाऊ दे मी मात्र मार खाता खाता वाचलो. "तेच ना करुन गेला गाव अन् आलं दाढीवाल्यावर नाव" नितीन बोलतो. रेणू हसू लागते." याच्या म्हणी मात्र काहीही " "शंतनु इज इक्वल टू दाढीवाला "म्हणत हसू लागते. "पण मला कळत नाही केतन ने असं का बरं केलं असावं" शंतनु विचारतो. नितिन पुढं होऊन म्हणतो." शंत्या आरं त्यो भूषण्या हाय ना लय ट्यांव ट्यांव करत बर्मुड्यावर फिरत असतो, अन् स्पोर्टस ची लावलेली कोणतीही नोटीस फाडून टाकत असतो" त्यात सायन्स व आर्टस् वाल्यांची खुन्नस असतिया दरवर्षी " त्याचीच जिरवायची म्हणून लिहलं असेल त्यानं" पण एवढ सगळं करुन आता मॅचेसला जाणं शक्य नाही होणार" असं शंतनु निराशेने सांगतो. "क्काय? " ग्रेट" रेणू ( आनंदाने) यावर नितीन उचकतो. "मजी?" नितीन शंतनुला विचारतो. अरे बाबांचा पारा पाहिलास...