पंधरावर्षांपूर्वी . . .
पंधरावर्षापूर्वी . . . . . एका खाजगी क्रृषीमहाविद्यालयात "सहायक प्राध्यापक" या भारदस्त नामाखाली माझ्यासारखं भारदस्त नसणारं व्यक्तिमत्त्व विद्यादानाचे कार्य पार पाडत होते. शेवटी कॉलेजनंतर अर्थार्जन हे जरुरीचं असतंच.त्यातून ही काहीतरी अजून पाहिजे या जाणिवेतून भारतीय अग्रगण्य वित्तीय संस्थेत चंदीगढ, भोपाल ,पटना, हैदराबाद व मुंबई इत्यादी विभागात नोकरीसाठी अर्ज केला. यासंदर्भात नवनाथ(अण्णा) अवताडे व सुनिल जाधव यांनी माहिती पुरवली. काही दिवसांनी भोपाल विभागातून कॉल लेटर आल्याचा घरुन फोन आला . म्हटलं "चलो भोपाल." भोपालची मानसिकता केली तोवर दुसर्याच दिवशी सकाळी सकाळी फोन आला. तेव्हा नेटवर्क सर्वत्र उपलब्ध नसायचे.आमचं एयरटेलचं सिमकार्ड त्यामुळे मोबाईल उंचठिकाणी ठेवायला लागायचा. दिवसभर मोबाईल उंच ठिकाणी ठेवून कॉलेजवर विद्यादानास जायचे दुपारी जेवणाच्या सुटीत आल्यानंतर मिसकॉल असतील तर कॉल करुन बघायचे. यथावकाश समजले की मुंबई विभागाचे पण पत्र आले आहे. मग म्हणालो " रहने दो भोपाल . . चलो मुंबई" घरी जाऊन कॉल लेटर घेतलं. बघितलं तर सदरची पुढील प्रक्रिया (GDPI)पुण्य...