Posts

Showing posts from July, 2023

शेतकर्‍यांची पोरं : उत्तरार्ध भाग पंधरा

 शेतकर्‍यांची पोरं : उत्तरार्ध भाग पंधरा आई नको नको म्हणत असताना दुचाकीगाडी घेऊन शंतनु व नितीन कॉलेजला जातात.बाबा बाहेरगावी असल्याकारणाने विचारणारं कुणी नव्हतं. अर्थात आईला " आजचा दिवस फक्त असंही बाबा देतच नाहीत गाडी"असं शंतनु विनवून पटवतो.आईला लेकाचं ऐकावंच लागतं. शंतनुला स्वत: गाडी चालवत तालुक्यास जाणं मौजेचे वाटायचं पण त्याच्या बाबांना ती चैन वाटाय़ची. नितीनही सोबत असल्याने त्यात जास्तच भर पडली. नितीनला तशी उगाचंच शायनिंग वाटायची पण मित्राला कसं नाही म्हणायचं.म्हणून तोही आनंद घेत होता. गाडीवरुन कॉलेजमधे आत शिरताना मुलामुलींनी यांच्याकडं पाहणं या दोघांनाही अप्रूप वाटायचं. तोच समोरुन रेणू दवे व बिंदू आल्याचं बघताच यांच्या चैतन्यात भरंच पडली जणू यापेक्षा आनंद तो काय.!! "अय्या ते बघ दोघे"असा रेणूचा आवाज येताच त्यांनी गाडी थांबवली. गप्पा मारल्या.थोडीशी ऐट मारली , गाडी वाहनतळावर लावली. शंतनु तर्जनीमधे चावी फिरवत होता .दोघेही आपापल्या क्लासरुमकडे निघाले. बिंदूची व नितीनची नजरानजर झाली.खरंतर तिला देखील गाडीची चैन पटली नव्हती.तिने नापसंती दर्शवली . आज बस पकडायची नव्...

शेतकर्‍यांची पोरं उत्तरार्ध भाग चौदा:

 शेतकर्‍यांची पोरं उत्तरार्ध भाग चौदा: सायंकाळी घरी पोहोचताच .आई आदेश काढते. त्यो कोंबडा देऊन ये देवस्कीचा. नितीन नापसंती दर्शवतो. बाळा आरं आकाड सरत आलाय. तुझ्या 'बा' ला सवड नाय पण देवस्कीचं मागं ठेऊन चालतं का कुठं. मग लागतीया साडसाती मागं. नित्या तिला थांबवत " आयं मला न्हाय कोंबडा कापायला याचा " आबा करतील ते" आरं तू नुस्ता आण कापून बाकीचं बघु घरात आल्यावर करु " आई बोलतच असते. "मावळतीला पाच दगडं ठेवायची हळदकुकु लावायचं कोंबड्याच्या तोंडात चार ठ्यांब पाण्याच द्यायचं. अन् घ्याचं देवाचं नाव." "आयं तूच करकी मग" नितीन बोलतो "आरं बाय माणसं नाहीत करत हे" "न्हायव्हय" करत आई कोंबडा पाय बांधून पिशवीत घालून देते. कोंबडा "को को को कोकोच को को को" करत अोरडत असतो. वाटेतून येणारे जाणारे " हं s आज हाय वशाट " या नजरेने त्याच्याकडे बघत होते. अवघडून कसाबसा देवस्की च्या ठिकाणी नित्या पोहोचतो . आधीच तिथं अनेक कोंबड्याच्या पिसांची रास दिसत होती. पाच दगडं ठेवतो.हळदकुंकु लावतो.कोंबड्याला पिशवीतून काढतो. ...

सज्ज व्हा

 सज्ज व्हा निवडणुकांचा फज्जा उडला कर्तव्यासी सज्ज व्हा लोकशाहीची लाज राखण्या थोडेसे निर्लज्ज व्हा जाणे येणे सुलभ जाहले काथ्याकुट हो कायद्याचा पक्षात माझ्या " राम " नाही का विचार सोडू फायद्याचा कुणी म्हणाले अडीच वर्षे ही. कुणी म्हणे ना ठरली ती एक दिसाचे बोट रंगूनी हरली बिचारी जनता ती धर्माधांना रोखण्या झाली मोट म्हणे ती मविआची पुलाखालुनी गेले पाणी सैर झाली गुवाहाटीची भूतकाळीचे पाप शोधण्या मंत्रजाप तो ईडीचा नको बुवा ती वेडीवारी जयघोष करु 'श्रीरामाचा' साम दाम दंड भेद जरी मंत्र असे हा सत्तेचा थोड्याश्या त्या लोभापायी ना गळा 'घोटू' नितीमत्तेचा भले बुरे ते घडून गेले विसरुन जावू सारे क्षणभर 'खंजिरी 'इतिहास असे हा कसा विसरावा या वळणावर कसा विसरावा या वळणावर #सुविकोळेकर

शेतकर्‍यांची पोरं उत्तरार्ध भाग तेरा:

 शेतकर्‍यांची पोरं उत्तरार्ध भाग तेरा: फिजीक्सचे सर वर्गात आले अन् अचानक मुलांना प्रश्नपत्रिका वाटल्या गेल्या.उत्तरपत्रिका दिल्या गेल्या. सगळेजण अवाक् झाले. कोणतीही पूर्व सूचना न करता अशीकशी परिक्षा घेऊ शकतात. सगळ्या मुलींनी " आ s ss "वासला. फक्त वीस मार्काचा पेपर.' युअर टाईम स्टार्ट्स नाऊ कंप्लिट विदीन फोटीफाईव्ह मिनीटस्' अशी"सर गर्जना" झाली. सगळ्यांना अशा आगंतुक परिक्षेची अपेक्षा नव्हती. सर्वांनी पेपर सुरु करताच सोडवायचे इतर पर्याय तपासले. आश्चर्य म्हणजे शेजारच्याचे प्रश्नही वेगळे होते. मुलांच्यावर सर सव्वाशेर होते. शंतनु बाजूला असूनही काही उपयोग होत नव्हता. तो त्याचा पेपर सोडवत होता. नितीन मेंदूला ताण देत भुवया ताणत आठवण्याचा प्रयत्न करत होता. अर्थात सगळ्यांचीच अशी परिस्थिती होती. सर अधूनमधून फि्रत होते कुणी चूळबूळ करताच "श्ssss सायलेंन्स" असा आवाज देत होते. नित्या इकडंतिकडं बघत होता . सर बाजूलाच येऊन उभे होते तरी त्याला समजले नाही. एवढ्यात सरांनी आवाज दिला " काय रे अवघड आहे काय पेपर ?" नितीन काहीतरी बोलायचे म्हणून बोलून ग...