मैत्र जीवांचे# शैलेश मोरे
मैत्र जीवांचे# शैलेश मोरे तो भेटला तेव्हा पूर्वमाहितीनुसार वलयांकित होता. तो दिसला की बाजूला मित्रांचे अन मैत्रिणींचे कोंडाळे! एमेस्सी ला एकाच डिपार्टमेंटला आमचीओळख झाली.आम्ही मूळातच असेच खुशालचेंडू अन सातारचा म्हटल्यावर विषयच संपला.पण तो काहीना काही गोष्टीत प्रसिद्ध होता. मग त्या चाकोरीबाहेरच्या का असेनात. महाराष्ट्रच लोकसेवा आयोगाच्या परिक्षेचा अभ्यास करताना अभी नही तो कभी नही या प्रतिज्ञेवर ठाम. इकडे एमेस्सी लेक्चरला दांडी पडु लागली मात्र महाशय जे होइल ते बघू म्हणत राहुरीतील झाडांच्या सावलीत रट्टा मारत होते. शैलेश मोरे!! होय. कर्मधर्मसंयोगाने त्यांच्या प्रयत्नांना यश आले. देईल ती परिक्षा पास होत,राजपत्रित अधिकारी म्हणून स्थिरस्थावर झाले. त्यांच्या सोबतच्या बर्याच आठवणी आहेत.एकदा कॉलेजमधे क्रिकेटच्या नाईट मॅचेस होत्या ,आम्ही एकाच संघात होतो.अर्थात तेच कर्णधार होते.मला गोलंदाजीपण द्यायचे." नीट टाक नायतर कानफडीन" म्हणून दमपण द्यायचे. एकदा एका फलंदाजाने उंच चेंडू फटकावला. आम्ही दोघेपण अंदाज घेत होतो मला समोरुन शैलेश दिसताच मी म्हणालो " (कॅच) तुम्ही घ्या तुम्ही घ्या...