कुणीतरी असतं
कुणीतरी असतं . . वर्गात पाऊल ठेवल्यावर आपणहून बोलणारं शाळेत उशिरा पोहोचल्यावर खोटी सबब सांगणारं. आपण खोड काढल्यावर आपली बाजू मांडणारं आपल्याच चुकीला 'चुकून 'झालं म्हणणारं कुणीतरी असतंच अवघड पेपरात उत्तरपत्रिका दाखवनारं कॉपीचा कागद आपल्याकडं फेकणारं. मार खात असताना धावून येणारं , आपल्यावर होणारा वार. वरच्यावर झेलणारं. कुणीतरी असतं रोज आपल्याकडं बघणारं मनातलं बरंच काही नजरेनंच सांगणारं. जीवनाच्या प्रवासात रोज भेटणारं . . अनोळखी असले तरी खरी सोबत करणारं . . अापणही असतो कुणासाठी कुणीतरी नकळत उमलत जावी जशी निरागस मैतरी . . . . . सुविकोळेकर