स्वातंत्र्यवीर सावरकर

 स्वातंत्र्यवीर सावरकर:


रणदीप हुडा अभिनीत चित्रपट पाहिला . दोन अडीच तासात एखाद्या थोर व्यक्तिमत्त्वाचे पैलू द्दश्य माध्यमातून समोर आणायचे म्हणजे मोठी आवाक्याबाहेरची गोष्ट असते.त्यात विदा सावरकर म्हणजे अशक्यच !! यापूर्वीही सुधीरजी फडके यांनी सुंदर प्रयत्न केला होताच.पुढे त्याची गुजराती आव्रृत्तीही निघाली. उत्तम!!
भूतकाळात डोकावताना भारतमातेच्या थोर सुपुत्राच्या अजरामर कारकीर्दीचा धांडोळा घेताना कितीतरी बारीक सारीक गोष्टी चित्रपटात काळजीपूर्वक मांडल्यात.
भयंकर प्लेगची साथ त्यात होणारे आप्तेष्टांचे म्रृत्यू.
त्यातही भयंकर म्हणजे इंग्रजाधिकार्यांकडून महिलांवर होणारे अत्याचार.
बालवयातील विनूचे मित्रमेळ्यातील जाणतेपण.तरुणवयातील विनायकची अभिनव भारत च्या माध्यमातून स्वातंत्र्याविषयीची उर्मी. जबरदस्तच !!
हिंदु मुस्लीम ऐक्यातून आंग्ल सत्तेला लावलेला सुरुंग"१८५७ चे स्वातंत्र्य समर" या पुस्तकातून जगासमोर आणण्याचे अलौकिक काम विदांनी केले. यातूनच अनेक भारतीय क्रांतिकारकांनी ब्रिटीशअधिकार्‍यांचा खात्मा केला. लंडनमधील अटकेत जहाजाच्या पोर्टहोलमधून समुद्रात टाकलेली ऐतिहासिक उडी व आजकालच्या तद्दन मसाला व धंदेवाईक स्टंट यांत कोसोंचे अंतर आहे. खुनशी इंग्रजांनी सूडभावनेतून भारतातील इंग्रज सरकारविरोधात काम केले म्हणून कायद्यात नसतानाही परदेशात सुनावणी करुन त्यांना डबल जन्मठेपेची शिक्षा देऊन अंदमानात पाठवले.माझी जन्मठेप या त्यांच्या पुस्तकात तेथील " बारीबाबू व मिर्झा पठाण"यांच्या अन्याय वागणूकीबद्दल सविस्तर आहेच, चित्रपटातही ते यथायोग्य दाखवले आहे. मिर्झाच्या अन्यायात स्वत:स इस्लामिक समजनार्‍या अनेकांत धर्मशुध्दीकरणाचा सहजसुंदर अविष्कार त्यांनी अंदमानात घडवून आणला.

सावरकरांच्या अंदमानातील कैदेवर एक स्वतंत्र चित्रपट होईल. त्यांच्या सुटकेसाठी अनेक पत्रव्यवहार झाले त्यांनी अनेक विणवण्या ब्रिटीश सरकारला केल्या.त्याला माफीनामे म्हटले गेले.म्हणू द्यात(युध्दात या गोष्टी ग्राह्य असतात). स्वातंत्र्य हा कोणत्याही व्यक्तीचा नैसर्गिक अधिकार आहे या न्यायाने गांधीजींनीही यासाठी पत्रव्यवहार केला. विनायक दामोदर सावरकर या बुध्दीजीवी व अष्टकलापारंगत व्यक्तिमत्त्वाची जागा ही अंदमानचा तुरुंग नसून भारतमातेच्या उध्दारासाठी व लोकांच्या कल्याणासाठी त्याचा उपयोग होईल अर्थात त त्कालीन सरकारच्या अटींच्या अधीन राहूनच!! साधारण नऊ दहा वर्ष‍ांच्या बेरहम तुरुंगवासातून सुटका होऊन रत्नागिरी येथे स्थानबध्द केले गेले. पण गप्प राहतील ते सावरकर कुठले!! तिथेही दलितांना मंदिरप्रवेशाविषयी जाग्रृति करुन सर्वांसाठी पतितपावन मंदिर स्थापन केले हा त्यांच्या सर्वधर्मसमभाव अशा प्रागतिक वैचारिकतेचा दाखला होता. "ने मजसि ने परत मात्रृभूमीला " असे विरहगीत तसेच "हे हिंदु नरसिंहा प्रभो शिवाजी राजा" असे स्फूर्तीगीत लिहीणारे सावरकर १९३८ साली मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष होते.
दुसर्‍या महायुध्दानंतर इंग्रजांनी भारतावरील बंधने शिथील केली अन सावरकर खर्‍या अर्थाने मुक्त झाले.
तोपर्यंत राजकारणात गांधीजी नेहरु जिना अशांची चलती होती. जिनांच्या मुस्लीम लीगच्या हेकेखोरपणास उत्तर म्हणू हिंदुमहासभेची स्थापना क्रमप्राप्त झाली. समकालीन अनेक नेते डॉ.बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी देशकार्य म्हणून संपर्क आला. स्वातंत्र्य जवळ आले असताना जिना आणि नेहरुसुध्दा अशा राजकारणधुरिनांची पंतप्रधान इच्छा लपून राहणे शक्य नव्हते. शेवटी कुटील ब्रिटीशकुटनितीचा विजय होऊन भारतमातेची शकले झाली. अर्थात तरुण जिना व नेहरुंचा मार्ग मोकळा झाला. सावरकरांचे मात्र अखंड भारताचे स्वप्न तसेच राहिले. नौखालीत गांधींजीवर प्राणांतिक हल्ला झाला. अन् भारतवर्षांत ब्राम्हणांवर हल्ले झाले.सावरकरांचे बंधू नारायणराव त्यातच गेले.
गांधीहत्येची सुई सावरकारांकडे आली अन अटकही झाली.पण हे तेजोवलय कळवळले ते १९६२ च्या युध्दात चीनकडून झालेल्या पराभवात!!
आयुष्यभर स्वातंत्र्याविषयी काय काय कल्पना करुन ठेवल्या होत्या अन . . हेचि फळ मम तपाला अशी भावना न होइल तर नवलच!!
ब्रिटीशांनी दिली नाही म्हणून त्यांची बॅरिस्टरकी (वकीली)नाकारता येत नाही . मराठी तसेच हिंदीत इंग्रजीला पर्यायी शब्द देणारा भाषातज्ञ हिंदुतेजाचा हा सळसळता यज्ञकुंड प्रायोपवेशनात शांत झाला.

ता.क. : संसदेत स्वातंत्र्यवीरांचा फोटो नसल्याने त्यांचे श्रेष्ठत्व कमी होत नसते. आयतेच स्वातंत्र्य उपभोगणाऱ्या आजकालच्या गलिच्छ राजकारणात वीर सावरकर क्वांग्रेस जनांना समजले नाहीत हे मान्य पण भक्त‍ांनाही स्वातंत्र्यवीर कितीसे उमगले हेही तपासणे क्रमप्राप्त ठरते . . . . .
  
अशा या अखंड भारतमातेच्या सुपूत्रास ही शब्दसुमनांजली . . . . . . !! सुविकोळेकर

Comments

Popular posts from this blog

मैत्र जीवांचे# शैलेश मोरे

एक कँप अाठवणीतला: स्काऊट गाईड १९९६