एक तोचि मल्हार . . !

 एक तोचि मल्हार ! !


छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या पुढच्या पिढीचे ध्वजवाहक आणि पेशवाईत तावून सुलाखुन निघालेले निडर व निबर व्यक्तिमत्त्व म्हणजे मल्हारराव होळकर.बाळाजी विश्वनाथ नंतर थोरले बाजीराव तदनंतर पेशवे नानासाहेब व नंतर माधवराव पेशवे अशा चारही पेशव्यांच्या कारकिर्दीत मैदान गाजवलेला भीष्मच जणू!! पहिल्या बाजीरावांचा सार्थ साथीदार.
राघोभरारीत उत्तरविजयानंतर अशा स्वारीमुळे उत्पन्न मिळावयाचे राहून जवळपास पाऊणकोट कर्ज झाले.अर्थात दफ्तरी सांभाळणारे भाऊसाहेबांनी यावर " मग " अशा स्वार्‍या काय कामाच्या " म्हणून आक्षेप घेतला व यावर "मोठ्या स्वार्‍या जिंकायच्या म्हटल्या की जास्तीची फौज लागते, इथूनपुढे मुलुखगिरी तुम्हीच करत जा" दफ्तरी आम्ही बघू " म्हणत रघुनाथराव पेशव्यांनी नाराजी व्यक्त केली.
इथे भाऊसाहेबांनी घरबंधू राघोबांची ही अवस्था केली तर इतर सरदारांची खैरच केली जाणार नाही अस मत पडलं. मात्र जेव्हा मल्हारबाबांची ,श्रीमंतांशी व भाऊसाहेबांची भेट होते तेव्हांचा गंभीर प्रसंग असा की
मल्हार राव विचारतात " भाऊसाहेब तुम्हांस शपथ आहे एकंदर दौलतीवर कर्ज किती आहे"
भाऊसाहेब सांगतात "पाऊणकोट रुपये"
यावर लिखापढी न जाण णारे मल्हाराव दौत लेखणी व कागद भाऊसाहेबांना देतात व सांगतात." यातील तीस लक्ष माझे नावे लिहा तीस लक्ष शिंद्यांच्या नावे लिहा"
अजून बाकी पंधरा लक्ष ती विंचूरकर व अंताजी मानकेश्वर यांचेकडून घ्या"
यावर "पंधरा लक्ष आम्ही वसूल करु पण तुमचे साठ लक्ष कधी येतील. असा प्रश्न येताच. मल्हारबांनी लागलीच विष्णू महादेव गद्रे या सावकारास बोलवून " भाऊसाहेबांस आजचे आज साठ लक्ष रु.द्यावे. अशी सूचना केली.
"अाता कर्ज फिटले ना?" मल्हारबांच्या या क्रृतीने भाऊसाहेब क्षमा मागतात"
पेशवाईत एवढी हुकमी 'वट'चालणारे व चालवणारे होळकर एकमेव खंदे सरदार होते.
एकदा मल्हारबाबां जनकोजी शिंदेंना म्हणाले होते की "जर चौफेर पेशव्यांना एकही शत्रू उरला नाही तर " हे(बहुधा ब्राम्हण) लोक आपल्याला धोतरं बडवायला लावतील." अशा प्रकारचं वक्तव्यं इतिहासात विदीत आहे. एखादा अवगुण असेलही म्हणून य‍ांच्या स्वामीनिष्ठेस बाधा येत नाही.
पाणिपताच्या रणधुमाळीत "धनगराच्या अशा मसलतीस कोण विचारतो " असं वक्तव्यं सदाशिवभाऊंनी वदल्यांच यात दिलं आहे. चूकबरोबर नंतरचा भाग पण अशामुळे कोण नाराज होणार नाही त्यात मल्हार राव तर ज्येष्ठ व ताकदवान सरदार असूनही त्यांना ही वागणूक तर बाकीच्यांच काय.
खरंतर जो कुणीही " जातीचा विचार करुन पुढे "जात" असेल तर त्याची मसलत कधीच तडीस "जात"नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी असा क्षुद्र विचार केला नाही म्हणूनच स्वराज्य उभे राहिले.
पेशवाईत याच उच्च नीचतेचा कळस झाला होता.

पुढे माधवराव पेशव्यांच्यासोबत राक्षसभुवनच्या लढाईत सुरुवातीला हैद्राबादी नबाबावे सैन्य फार असलेचे पाहून ज्येष्ठ मल्हार रावांनी माधवरावांस माघारीचा सल्ला मल्हारबांनी दिला. " रावसाहेब माघारी चलावे आपण पुण्याचे राज्य करु" यावर माधवराव प्रत्युत्तर देतात.
" काकासाहेब आपण मागे पानिपतावर भाऊसाहेबांस बुडविल्याचे ऐकतो;पण आज ते खरे झाले" अर्थात पोरसवदा माधवरावांकडून साठीतल्या मल्हारबांचा असा पाणउतारा करणे योग्य नव्हतेच. साठीतला योध्द्याने "रावसाहेब चलावे माझीही तरवार पहावी म्हणत" रणी निघाले अर्थात विजयी होऊनच थांबले.
आधुनिक पानिपत वाचल्यानंतर पराभव यांच्यामुळेच झाला असा काहीसा मतप्रवाह झाला होता.पण त्या य़ुध्दापूर्वीची पार्श्वभूमी वाचता " युध्दात तसा काही प्रसंग गुजरला तर आपला कुटुंबकबिला शत्रूपासून सांभाळावा असेच भाऊसाहेब पेशवेंचे नियोजन होते. व त्याप्रमाणेच अंमलबजावनी झालीही. असो.
मल्हारराव होळकर काल्पीनजीक मार्तंडाचे नाव घेऊन यमुनेत धाडसाने हत्ती घालतात व फौज नदी पार करते.
त्याच ठिकाणी इंग्रजांनी नदी पार करण्याचा यत्न केला मात्र नदीने उतार दिला नाही त्यांची बरीच फौज बुडुन मेली. तेव्हा आश्चर्य वाटून इंग्रज सेनापती " मल्हारराव होळकर मनुष्य नव्हे ईश्वराचा अंश खरा" असे उद्गार काढतो.
"मल्हार आया" म्हणून शत्रूच्या छातीत ध डकी भरवनार हे वादळ १७६५ -६६ ला थांबले. . .

@सुविकोळेकर

Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीर सावरकर

मैत्र जीवांचे# शैलेश मोरे

एक कँप अाठवणीतला: स्काऊट गाईड १९९६