फडनवीस ते फडनवीस :
फडनवीस ते फडनवीस :
उत्तर पेशवाईत (पानीपतानंतर) मराठेशाहीतअनेक मुत्सद्दी होऊन गेले.ज्यांनी छत्रपतींचा भगवा फडकत ठेवला.तशी पानीपतानंतरची हानी पेशवे माधवरावांच्या काळात भरुन निघाली महादजी शिंद्यानी उत्तरेत जाऊन नजीबखानाची कबर उध्वस्त केली.कर्तबगार माधवराव लवकरच निर्वतले.मग त्यांचे धाकटे बंधू नारायणरावांना पेशवेपदावर आणले.जे की रघुनाथराव पेशवे (थोरल्या बाजीरावांचे दुसरे पुत्र) रुचत नव्हते. मग कारस्थानी आनंदीबाई-रघुनाथ दांपत्याने ध चा मा करुन पुतण्या नारायणरावांचा वध करविला. त्या न्यायदानात रामशास्त्री प्रभुण्यांनी रघुनाथरावांना देहांत प्रायश्चित्त सांगूनही, रघुनाथरावांनी अतिउत्साहात सातारच्या छत्रपतींकडून पेशवाईची वस्त्रे आणून पेशवेपदी बसलेही(पुणेकरांना ते रुचले नव्हते) व नानांच्या नाड्या आवळ ल्या. धोरणी नानांनीही नमते घेतले.
आनंदीबाई तर" मी मिरवणार समद्यांची जिरवणार" अशाच अविर्भावात होत्या.
अशातच नारायणरावांच्या गर्भार पत्नी गंगाबाईंवर तो नारायणरावांचा वंश खुडण्याचा असफल प्रयत्न अानंदीबाईंनी केला. . . .मोरोबा दादा फडणवीस हे त्यांचे बंधू पक्के राघोबादादंचे समर्थक यांनाही नानांची कारभारी नको होतीच.त्यांनीच शनिवारवाड्यात सदाशिव भाऊंच्या पत्नी पार्वतीबाईंच्याकडून दिवाणपदीचे अधिकार घेतले.इत्थपर
गप्प बसतील ते नाना फडणवीस कुठले मग मात्र गंगाबाईंना पुरंदरास हलवून नाना फडणवीस व इतर सरदारांनी येणार्या पेशव्याची गंगाबाईंसह काळजी घेतली.
आणि गंगाबाईंच्या पोटी पुत्र जन्मला! पुणेकरांनी त्यास माधवरावांचा पुनर्जन्म समजून त्यास दैवी चमत्कार असे समजले. . . तोपर्यंत नाना फडणवीस व मंडळींनी राघोबादादांच्यावर राजकीय खेळी उलटवून त्यांना पळता भुई थोडी केली. कोवळ्या बालकाची पेशवेपदावर नियुक्ती केली. पेशवे सवाई माधवराव या नावे कारभार सुरु झाला अर्थात मुख्य कारभारी होते
ना ना फ ड ण वी स.
शिंदे होळकर या मुख्य मैदानी लढवय्यांसह सखारामबापूंसारख्या अनेक धू्र्त मंडळींची मोट बांधून नानांनी इंग्रजी भुजंग मराठी सत्तेपासून वीसेक वर्षे लांब ठेवला.
हैदराला पायबंद घालून निजामाशी धोरणी राजकारण करवले. एकाचवेळेस अनेक संस्थानांशी आपले सलोख्याचे संबंध प्रस्थापित करुन अगदी इंग्रज व फ्रेंचाच्या हालचालीवर लक्ष ठेवून आपल्या सोयीचे राजकारण केले. अर्थात नाना त्यावेळेस जगातील सर्वात जास्त पॅकेज घेणारे सी.ई.ओ.होते. इंग्रज तर नानांचा सगळ्यात जास्त द्वेष करत त्यांना नानांच्या बुध्दीजीवीपणाचा राग यायचा. इंग्रज हा आपला राष्ट्र शत्रू आहे अशी नानांची ठाम समजूत होती अशा या धोरणी नानांना आपल्या म "रण" मैदानावरची मर्दुमकीच्या मर्यादा माहित होत्या. यास्तवच त्यांनी देशभर विविध भागातील सावकारांच्याशी आपुलकीचे यांचे संबध होते मुबलक पैसा आडका कमवून ठेवला होता. त्यांनी आपल्याभोवती स्व संरक्षनाचे कडे उभारले होते. बर्याचदा दरबारात बोलणी हातघाईवर (अगदी टाळूनही)यायची तेव्हा मात्र त्या परिस्थितीला शांतपणेच सामोरे जायचे. आणि मराठी राज्य हितासाठी शिंदे व नाना हे एकत्र यायचे मग त्यांचा कधीही अभिमान आडवा यायचा नाही.पाणिपत पाहिलेले, माधवरावांचे कारभारी नाना ,बारभाई, मोरोबा राघोबा बंड ,सालभाई, हैदर, निजाम , अगदी अगदी घाशीरामाचा प्रकार , खर्ड्याची लढाई पुढे जाऊन तरुण सवाई माधवराव यांचाही शनिवारवाड्यात कारंज्यावर पडून म्रृत्यू (हेही नानांच्या हेकेखोर जरबेमुळे गेले असा एक प्रवाद आहे) , महादजी शिंदेसुध्दा नवज्वराने निघून गेले.(यावर इंग्रजांनी नानांनीच त्यांच्यावर विषप्रयोग केला असे लिहून ठेवले)असे अनेक बारीकमोठे प्रसंग हाताळनारे नाना उतारवयात त्यांना अवकळा आली.
दौलतराव शिंदे हे दुसर्या बाजीरावाच्या(राघोबादादांचा मुलगा) बाजूचे होते. अंतर्गत लढायांत होळकरांचे देखील महत्व कमी झाले होते. (नानांनीच पुढे बहादूर यशवंतराव होळकरांचा गुपचुप पाया घातला) दौलत-बाजी पर्वात नानांना पुने सातारा वाई रायगड व महाड अशा ठिकाणी पलायन करावे लागले. . . महाडमधे असताना रघुनाथरावाचा वंशज पेशवा नकोच म्हणून दुसर्या बाजीरावास विरोध केला.
तिथून त्यांनी एक जबरदस्त खेळी केली.पण त्यावेळी राजकीय गुंतागुंत व घडामोडी एवढ्या झाल्या की स्वता: नानाच दुसरा बाजीरावच पेशवा व्हावेत या मताचे झाले. स्वत: बाजीरावसुध्दा नाना फडणवीसांना टरकून असत.पण अंतर्गत त्यांच्या विरोधातच कुरघोड्या करत. एका विश्वासाच्या मसलतीच्या वेळी घाताने नानांना कैद केली गेली. अन् त्यांना मावळती कळा लागली. नंतर त्या ध डपडी व महत्वाकांक्षी जीवाला म्रृत्यूने गाठलेच.सन १८०० मार्च १३ मधे.अनेकांनी शोक व्यक्त केला.
फक्त इंग्रज सोडून! ! ! !
सत्तेच्या सारीपाटात क्रृष्णधवल घरात धूमाकुळ घालणारा खर्या अर्थाने नाना "वजीर" होते . . .
नानांच्या रुपाने पेशवाईतले शेवटचे शहाणपन गेले.
त्यांच्या पश्चात दुसर्या बाजीरावाच्या काळात मराठशाही इंग्रजांच्या घशात गेली . . .ती कायमचीच! !
नक्की वाचा!!
वरदा प्रकाशनचे
वा. वा. खरे लिखीत
नाना फडनवीस यांचे चरित्र
इति. सुविकोळेकर . .
Comments
Post a Comment