गेट टुगेदर व्हावे नेहमी
गेट टुगेदर व्हावे नेहमी
गेट टुगेदर व्हावे नेहमी
एकमेकांसी भेटावे नेहमी
आठवणीत त्या 'शाळ'पणाच्या
जगत रहावे नेहमी नेहमी
"अडचणी"त्या असती नेहमी
पिच्छाच त्या पुरवती नेहमी
सोडवण्यासी त्यांचा गुंता
भेटत रहावे नेहमी नेहमी
कुणी म्हणतसे" मिथाच" कल्ला
भेटूनी करती हल्लागुल्ला
अरे मिथ्याच त्या कल्ल्यासाठी
जमत जावे नेहमी नेहमी
मला नाही रे वेळच आता
मुलबाळं ही झाली आता
'त्यांच्याच'सारखं जगण्यासाठी
येत रहावे नेहमी नेहमी
कुणास वाटे उपटसुंभ मी
रिकामटेकडा अन् 'शुंभ' मी
उदासवाणं सोडून जगणं
"जिवंत"जगावे नेहमी नेहमी
आठवणींचा "पर्जन्य" तो
वर्तमानातील वणवा तो
त्या वणव्यावर पाणी शिंपूनी
भिजत रहावे नेहमी नेहमी
भिजत रहावे नेहमी नेहमी
सुविकोळेकर
Khupach sunder...
ReplyDelete