सज्ज व्हा

 सज्ज व्हा


निवडणुकांचा फज्जा उडला

कर्तव्यासी सज्ज व्हा

लोकशाहीची लाज राखण्या

थोडेसे निर्लज्ज व्हा


जाणे येणे सुलभ जाहले

काथ्याकुट हो कायद्याचा

पक्षात माझ्या " राम " नाही

का विचार सोडू फायद्याचा


कुणी म्हणाले अडीच वर्षे ही.

कुणी म्हणे ना ठरली ती

एक दिसाचे बोट रंगूनी

हरली बिचारी जनता ती


धर्माधांना रोखण्या झाली

मोट म्हणे ती मविआची

पुलाखालुनी गेले पाणी

सैर झाली गुवाहाटीची


भूतकाळीचे पाप शोधण्या

मंत्रजाप तो ईडीचा

नको बुवा ती वेडीवारी

जयघोष करु 'श्रीरामाचा'


साम दाम दंड भेद जरी

मंत्र असे हा सत्तेचा

थोड्याश्या त्या लोभापायी

ना गळा 'घोटू' नितीमत्तेचा


भले बुरे ते घडून गेले

विसरुन जावू सारे क्षणभर

'खंजिरी 'इतिहास असे हा

कसा विसरावा या वळणावर


कसा विसरावा या वळणावर


#सुविकोळेकर

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीर सावरकर

मैत्र जीवांचे# शैलेश मोरे

एक कँप अाठवणीतला: स्काऊट गाईड १९९६