शेतकर्यांची पोरं उत्तरार्ध भाग तेरा:
शेतकर्यांची पोरं उत्तरार्ध भाग तेरा:
फिजीक्सचे सर वर्गात आले अन् अचानक मुलांना प्रश्नपत्रिका वाटल्या गेल्या.उत्तरपत्रिका दिल्या गेल्या.
सगळेजण अवाक् झाले. कोणतीही पूर्व सूचना न करता अशीकशी परिक्षा घेऊ शकतात. सगळ्या मुलींनी
" आ s ss "वासला.
फक्त वीस मार्काचा पेपर.' युअर टाईम स्टार्ट्स नाऊ कंप्लिट विदीन फोटीफाईव्ह मिनीटस्' अशी"सर गर्जना" झाली. सगळ्यांना अशा आगंतुक परिक्षेची अपेक्षा नव्हती.
सर्वांनी पेपर सुरु करताच सोडवायचे इतर पर्याय तपासले. आश्चर्य म्हणजे शेजारच्याचे प्रश्नही वेगळे होते.
मुलांच्यावर सर सव्वाशेर होते. शंतनु बाजूला असूनही काही उपयोग होत नव्हता. तो त्याचा पेपर सोडवत होता. नितीन मेंदूला ताण देत भुवया ताणत आठवण्याचा प्रयत्न करत होता. अर्थात सगळ्यांचीच अशी परिस्थिती होती. सर अधूनमधून फि्रत होते कुणी चूळबूळ करताच "श्ssss सायलेंन्स" असा आवाज देत होते.
नित्या इकडंतिकडं बघत होता . सर बाजूलाच येऊन उभे होते तरी त्याला समजले नाही.
एवढ्यात सरांनी आवाज दिला " काय रे अवघड आहे काय पेपर ?"
नितीन काहीतरी बोलायचे म्हणून बोलून गेला.
" प्रश्न सोपं हायती पण उत्तरं अवघड हायती"
तणावपूर्ण वर्गात एकंच हशा पिकला.
सरांच्याही चेहर्यांवरचे भाव बदलले. पण तसे न दाखवता. "शूss लास्ट टेन मिनीट्स ओन्ली."
वर्ग शांत झाला.कुणीच काही लिहीत नव्हतं.
" सी यू टूमारो" म्हणत सर पेपर घेऊन गेले.
सर्वांना वेळ टळली याचाच आनंद झाला.
वर्गातून बाहेर पडताच रेणू " हे कायेय्य अशी कुठं घेतात का परिक्षा " शंतनु डोळे मोठ्ठे करत श्वास घेतो.
नितीन म्हणतो.
"तसं सरांच बरोबर हाय अशीच पाहिजे परिक्षा न सांगताच घेतली पाहिजे, अगोदर कळवून तर सगळेच अभ्यास करुन येतात.अचानकपणे घेतली की बरोबर कळतं कोण किती पाण्यात आहे ते"
मागून बिंदु येत असते तीही " अगदी बरोबर"
रेणूला ते आवडत नाही. " बघूबघू कळेल लवकरचं कोण किती पाण्यात आहे ते?"
नितीन बोलतो
"मला तर माहिती आहे आमच्या डोक्याच्यावर पाणी आहे "
शंतनू मधेच बोलतो. " नितीनचं बरोबर आहे आयुष्यात आपण नेहमी तयार पाहिजे कोणत्याही परिक्षेला तीच खरी परिक्षा " बाकी जे ठरवून होतात ते कार्यक्रम असतात.
रेणू फक्त डोळे विस्फारते.
लायब्ररीच नाव सांगून नितीन निघू लागतो.
"थांब रे मीही येतेय रे" बिंदू
शंतनु त्याला थांबवतो चल चहा घेऊ मग जा.
नितीनला शंतनुला नाही म्हणता येत नाही.
" मी आहे लायब्ररींमध्ये तुम्ही या जाऊन" बिंदू.
"ऐ चल अर्धा अर्धा घेऊ "
आता बिंदूला नाही म्हणता येत नाही.
रेणू उगाच ओठ दाबत हसू लागते.
"नक्की करतोस काय रे लायब्ररींमध्ये जाऊन?" रेणू विचारते.
नितीन तिच्याकडे बघून बोलणार तोवर ती विचारते
"बरं बरं मग सध्या काय वाचतोयंस"
"इसापनिती " नितीन सांगतो.
शंतनु त्याच्याकडे बघत म्हणतो " क्काय इसापनिती?, ते तर लहान मुलांसाठीचं आहे पुस्तक "
"पण ते मोठ्या लोकांनी वाचू नये असं कुणी सांगितलं नाही. बरं लहानवयात सगळ्यांनाच हे वाचायला मिळतं असं नाही.जर सगळ्यांनी हे लहानपणी वाचलं असतं तर जगात अाहे याच्यापेक्षा अजून जास्त नितीमत्ता पहायला मिळाली असती. खरंतर हे पुस्तक मोठ्या लोकांनीच वाचायला पाहिजे म्हणजे किमान सामान्यपणे कसं वागांव हे सर्वांना कळेल.
तूही वाच रेणू तूला जास्त . . (गरज आहे असं म्हणायचं असतं) आवडेल. बिंदू हसते.तिला टोमणा कळतो.
रेणू वैतागून कधीकधी अभ्यासही करत जा " म्हणजे डोक्यावरुन पाणी जाणार नाही" असं ठणकावते.
दोनमधे 'चार' चहा येतो. नितीन साधारण अडीच घोटात चहा संपवतो. बिंदू विचारते " हा इसाप कोण असतो"
नितीन उत्स्फूर्तपणे सांगतो." तो एक ग्रीक गुलाम आहे ज्याने इसापनिती जगाला सांगितली " बाकीचे सावकाशीनं चहाचे घोट घशाखाली टाकत असतात.
क्रमशः
लेख वाचून लेखकाचे विचार किती सुंदर आहेत याचा प्रत्यय येतो, ग्रामीण जीवन किती नसा नसात भिनले आहे याचा दाखला, पण ग्रामीण भागात विचार किती प्रगल्भ आहेत याचापण पण दाखला.
ReplyDeleteKhup chan Sir...
ReplyDeleteWe need to always ready for any situation...