असा मित्र भेटावा. .

 असा मित्र भेटावा. .


आमच्या आयुष्यांत भगवंताने ठरवून पाठवलेला.कमालीचा शांत अाणि सुस्वभावी. ओघाने आलेली जबाबदारी प्रामाणिक पणे पुर्ण करानारा किंबहुना तसा प्रयत्न करत राहणारा मित्र म्हणजे सुनिल.खरंतर मित्राच्यापुढेही जे काहीजण दुर्मीळ असतात असा वामनमूर्ती . कधीही शॉर्टकटच्या फंदात न पडणे रात्री उशिरा अभ्यास करुन पहाटे उजळणी करणे.मग परिक्षेला सामोरे जाणारा योध्दाच जणू. सुंदर हस्ताक्षर . वनविद्या पदवीचा विद्यापीठाचा सुवर्ण पदक जेता जिथे आम्हाला लेग बायची धाव निघायची भ्रांत असायची तिथे हा षटकार हाणायचा.
विद्यापीठ संघात कबड्डी खेळनारा. वार्षिक स्नेहसंमेलनात ब्राझील. . . . . .तारारारारारारारा व अपने जहां के हम बादशाह है" गाण्यावर नाचायची हौस भागावणारा.
आम्ही एम.एस्सीला एका खोलीत राहायचो सोबत विजय अरगडे,सतीश मुळे विकास नव्हाळे तसेच वनविद्या शिकणारे तमाम क्रुषीमित्र एकत्र धिंगाना घालायचो.
एम.एस्सी च्या द्वितीय वर्षात आमचा लोकसेवा आयोगाचा पूर्वपरिक्षेचा निकाल लागला मी पास झालो अन् सुनिलला खुप बरं वाटलं. खरंतर कँटिनवर कुचाळक्या करणारे आम्ही.पण बर्याच जनांना अहो आश्चर्यम् झाले.मुख्य परिक्षा लगेच होती सुनिल अभी नही तो कभी नही म्हणत मला पाठिंबा द्यायचा.अक्षरशः माझे कपडेपण धुवायचा "तुमी अभ्यास करा ओ"म्हणायचा.पुढे मग राहुरीला अभ्यासाला प्रमोद जरग व राहुल देशपांडे यांच्यासोबत गेलो.पण मुख्य परिक्षेत दूरवर उडालो.आम्ही कशीतरी एमएस्सी पुर्ण केली पण सुनिलने कीटकशास्त्र या विभागात संशोधनात दिवसरात्र झटुन मूळ निरीक्षणं नोंदवुनच प्रबंध पुर्ण केला.एमएस्सी नंतर एका खाजगी कंपनीत मी अनिच्छेनं रुजु झालो अन् लगेच निव्रृत्तपण झालो.अन् सुनिल अभ्यास करायला पुण्याला
आमचा मित्र प्रविण देशमुख यांचेकडे गेला.
मला नोकरी नाही हे त्याला माहित होते.त्याने मला फोन करुन सरळगाव क्रृषी माहाविद्यालयात एक जागा रिक्त आहे तुमी जाऊन बघा म्हणुन सांगितले .तिथे मला लगेच रुजु करुन घेतले.काही दिवसातच त्याला भारतीय स्टेट बँकेत आश्वस्त नोकरी लागली.वर्षभरात पुन्हा त्याने मला बँकेतील संधींविषयी मला निरोप कळवला. व्हाईट कॉलर जॉब आहे बिनधास्त करा.मलाही नशिबाने साथ दिली आमचीपण तिथे निवड झाली.ट्रेनिंग गोवा येथे होते.नंतर गोवा एंजॉय करता येणार नाही आताच सगऴंकाही फिरुन घ्या म्हणुन पंधराशे रुपये मला पाठवुन दिले. खरंच संधी येउनही नंतर गोवा फिरताच आला नाही.आमच्या सुखांत कधी नसेल पण दु:खात नेहमीच असनारा सुनिल मात्र पडद्यामागेच असतो.
देवा तुझे असंख्य आभार तुझा प्रतिनिधी नेहमी आमच्यासोबत असतो.
वाढदिवसांच्या हार्दिक शुभेच्छा सुनिल.
@सुविकोळेकर

Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीर सावरकर

मैत्र जीवांचे# शैलेश मोरे

एक कँप अाठवणीतला: स्काऊट गाईड १९९६