शेतकर्यांची पोरं उत्तरार्ध भाग नऊ
शेतकर्यांची पोरं उत्तरार्ध : भाग नऊ
https://suhaskolekar1010.blogspot.com/2023/02/blog-post.htmlक्लासरूम पूर्ण भरली होती. नितीनला वेळेत पोहोचल्याच बरं वाटलं.वर्गात प्राध्यापिका आल्या त्यांनी शिकविण्यास सुरुवात केली. बायोलॉजी नितीन लक्ष देऊन ऐकत होता.हिरव्या (ग्रीन)बोर्डवर मॅडम इंग्रजी थर्ड लिपीमधे झरझर लिहायच्या , मुलं कळो न कळो पटपट उतरुन काढायची. मॅडम मधूनच वर्गातून फेरी मारत मारत शिकवत असत. अचानक त्यांच लक्ष एका ठिकाणी गेलं. "हे कुणाचं आहे "
मॅडम विचारतात.
नितीन बावरुन हळुच म्हणतो.
" आमचं आहे"
काय आहे त्यात? मॅडम विचारतात.
" शेंगा अन् तागडी(तराजू) हाय म्याडम"
शेंगा इकायला आणल्या हुत्या थोड्या राहिल्यात."
नितीन सरळ सांगतो.
वर्गात उगाच हशा पिकला.
"अरे ते बाहेर ठेवायचं इथं ओंगळवाणं दिसतंय ते " मॅडम बोलतात.
वर्गातील मुलं हसू लागतात. मुलीही फिदीफिदी करतात.
नित्याचं मन खट्टू होतं. नाराज नितीन खालमानेनेच बोलतो.
" ओंगळवाणी आसली तरी ' जबाबदारी' आहे ती कुठंबी टाकून नाय चालत म्हनून ठेवलीय इथं"
बाईंना त्याच्या बोलण्याचं कुतूहल वाटतं. त्याही गालात हसत म्हणतात. "बरोबर आहे तुझं"
हसणारा वर्ग शांत होतो.
मुलींच्या एका कोपर्यांमधे मात्र मघापासुन पडलेला एक चेहरा खुललेला जाणवत होता.
दुपारच्या सुटीत फायनलची काही मुलं प्रयोगशाळेजवळ गोंधळ घालीत होती. नितीनचं लक्ष गेलं पण कुठं ह्यांच्या फंदात पडा.म्हणून तो निघू लागतो. पण "ऐ चश्मीस "असा आवाज येताच तो गर्रकन मागे वळून तिकडे जातो.
तर. . .
घोळक्यात एक मुलगा घेरलेला होता. तो विनवीत होता.त्याला काहीजण विचारत होते. " ही अंतिम यादी आहे आता फाडली तरी चालेल" हे कुणी लिहीलंय. नोटीसवर.
"माजला काय फश्टीयर". (कमरेखालची शिवी)
नितीन लगबगीन घोळक्यात शिरतो. समोर शंतनुला बघताच रागाने त्याच्या अंगात वीरश्री संचारते.
तो शंतनुला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो.
तोवर " एकजण म्हणतो. " हा बघ चंकी पांडे ,ऐ ह्याला धरा हा पण याचाच मित्र आहे याच्याच . . . . . . .मस्ती आहे जास्त.
नितीन प्रयत्न पूर्वक शंतनुला बाहेर काढू लागतो.तोवर कुणीतरी त्याला हिसका देतं.
चिडलेला नितीन मागे वळून जोरात ओरडतो .
" तुमच्या आयला तुमच्या . . . "
ज्याच्या . . . बुडात दम आहे त्यानं याचं फुडं" आक्रमक नित्याला बघून.
कुठं इज्जत घालवा म्हणून घोळक्यातील मुलं बाजूला होत जातात.
सावरलेला शंतनु " राहु दे म्हणत असतो."
कुणीही समोर येत नाही.
शंतनु म्हणतो.
" खरंचआम्ही नोटीसवर काही नाही लिहीलं"
आणिजरी लिहीलं असतं तरी
" कुणी लिहिलंय तेपण खाली लिहीलं असत " नित्या दरडावतो. तोवर त्या मुलांच्यात 'लिहीणारा वेगळाच आहे' अशी काहीतरी कुजबुज होते. सगळे निघू लागतात.
शंतनु म्हणतो" जाऊदे रे सिनीयर आहेत."
" आसूदेत की मग काय "धा" महिण्याच हायती काय?" नितीन बोलून जातो.
"म्हणजे?" शंतनु विचारतो.
शंतनुच्या कपाळावर प्रश्नचिन्ह बघून .
नितीन हसून म्हणतो. ' त्यासाठी बायोलॉजी ठेवावा लागतो"
इतक्या तणावानंतरही नितीनच्या विनोदबुध्दींच कौतुक वाटतं. शंतनु त्याच्या खांद्यावर हात टाकून त्याला वाकवत म्हणतो. " तू संकटमोचक आहेस राव"
मजी?(म्हणजे)? नितीन विचारतो.
"हनुमान" शंतनु सांगतो.
दोघेही हसत निघतात.
कॉलेज सुटताना . . .
" पण काय गरज होती फायनलच्या मुलांशी हुज्जत घालायची "? बिंदू ठणकावते.
नितीन तिला विचारतो."दुपारी वर्गात बायो.च्या तासाला वर्गातील सगळेजण हसत असताना.
तू हसलीस? " नितीन विचारतो.
"मी कशी हसेन ?" बिंदू
"मॅडमनी मला बरोबर म्हटल्यावर
वर्गातआनंद कुणाला झाला?" नितीन.
"हो मला झाला आनंद" बिंदू
नितीन विचारतो. " का?"
" अरे तू मित्र आहेस " बिंदू
तसंच शंतनुपण मला मित्रापेक्षा जास्त आहे.
संपला विषय!!!
स्मितहास्य करत बिंदू त्याच्याकडे पहातच राहते . .
@सुविकोळेकर
Comments
Post a Comment