मित्र असा लाभावा

 


मित्र असा लाभावा . .

औ . . कोळेकर ?
. . "मजी नागपूर अॅग्री का तुमी"
वाय सिरीज . . . . ?.
मग येक वर्ष काय केलं. .
यम्पीयश्शी . . ?
अच्छा अच्छा . .
गाव कुटलं?? पाटण ?
मजी सातारा.
अामच्याकडं हुतं की पाटणच एकजण
भरत . . .
भरत पवार . . फॉरेश्ट्रीला हुतं"
यएमेशी "जीपीबी" आयला लय हुशार माणूस राव.
हा आमचा पहिला संवाद
किशोर वाघमोडे यांच्या सोबतचा
पक्का माळशिरसचा सोलापूरी खर्‍या अर्थानं रांगडा गडी. पल्लेदार दाट मिशा साधारण उंचीचा पण ठाशीव गडी.
एकदम चकचकीत भारद्वाज पक्षा सारखा.
सुनिल जाधवमुळे त्याची एमेस्सी प्रथमवर्षाला ओळख झाली. तोअकोला उद्यानविद्या महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. तिथेच म्रृदविज्ञान विभागात एमेस्सी ला प्रवेश घेतला होता. मला नेहमी म्हणायचा तुमचं
" डिपारमेंट (पशुसंवर्धन )लय निवांत "
कवा यमेशी हुईल कळणारपण नाय"

कॉलेजमधे बहुधा कॅंटीनवरच रेंगाळणार्‍या अनेक असामी पैकी तो मी व सुनिल असायचो.
चहाचं बिल देताना गंमत करायचा . . .
"ओ थांबा देतो मी . . .बिल . . "
"बर देताय व्हय द्या द्या . . "
"अ थांबा की देतो मी एवढी का घाई करताय . . "
मग लगेच म्हणायचा.
थांबा की सुन्या देतोय बिल"
यावर सुनिल म्हणायचा
"तुझं का चालनात वै पैसं?
मग किशोर म्हणायचा.
तुझं खात हाय न्हवं का? औ ?
"अ थांबा कोळेकर मांडतूय सुन्या"
शेवटी सुनिलंच बिल मांडायचा त्याचं " खातं "होतं तिथं.
दोघं जिवाभावाचे मित्र ,पण भांडायचे भारी.
किशोर त्याला म्हणायचा " लका कितीबी कर तुज्यासाठी तू शेवटी फॉरेश्ट्रीवरच जाणार."
अजूनही सुनिल व किशोर लहान मुलाप्रमाने भांडतात.

किशोरचे एक नातेवाईक अकोल्यात बहुधा पोलिस अधीक्षक पदी होते.त्यामुळे किशोरला अप्रत्यक्षपणे सगळे टरकून असायचे.पण तो बिचारा त्याची अजिबात घमेंड करायचा नाही किंवा तस वागायचा पण नाही.
एकदम जमिनीवरच असायचा. शेगाव संस्थान येथे त्याचे नातेवाईक होते दिलदार स्वभावाचा किशोर मला व सुनिल ला घेऊन गेला होता . कर्मधर्मसंयोगाने आमचे भूतपूर्व सिनीअर रवि वाघमोडे त्याच ठिकाणी त्यांच्या नातेवाइकांत भेटले होते.
आमचं बोलणं झालं किशोरला त्याच अप्रूप वाटलं.

एखाद्यावेळेस परिक्षावगैरे काही असेल तर किशोर होस्टेलमधे पांढरीशुभ्र बनियन व गडद हिरव्या रंगाचा बर्मुडा यावर पुस्तक हातात घेऊन फिरायचा.
" आयला . . . वाचायला घेतलं की उचलून फेकतंय "असं म्हणायचा."
गप्पा हा त्याचा आवडता विषय होता. जुन्या गोष्टी, मैत्रीतिल चेष्टामस्करी, राजकारण यावर बोलायचा.
मा.शरद पवारांचा खंदा समर्थक.
भोजन झालं का ? असं विचारताना
तो विनोदी ढंगान म्हणायचा. " भवजन झालं का?
एकदा तो व आमचे मित्र शरद बेलदार ईगतपुरीचा ध्यानधारणेचा कोर्स करुन आले होते.  त्याचा चांगलाच प्रभाव त्याला जानवत होता. एमेस्सीच्या दुसर्‍या वर्षाला किशोरसोबत कीटकशास्त्राचा बाबा फंड हा सिन्सिअर व अभ्यासू रुमपार्टनर होता.पुढे बाबा भारतीय क्रृषी संशोधन संस्थेत शास्त्रज्ञ म्हणून नावारुपास आला.

साधारण एमेस्सी होईपर्यंत यथातथाच चाललेलं आयुष्य.नंतर शेवटच्या काही दिवसात आमचा हुषार मित्र सतिश मुळे हा एका शेतीआधारित बहुराष्ट्रीय कंपनीत रुजू झाला होता.त्याच कंपनीत किशोरने मुलाखत दिली व तो सन्मानजनकरित्या दाखल झाला. संपूर्ण भारतभर त्याला फिरावे लागत असे. फोनवर बोलणं होतंच असायचं.वैतागलेला असायचा.काही कटूगोड अनुभवानंतर किशोरने सदर नोकरी सोडली. आर्थिकचा विषय नव्हता पण नोकरी तर पाहिजेच म्हणून बँकिंगचा अभ्यास करु लागला व बँक ऑफ इंडियात गडी रुजू झाला. सध्या अधिकारी पदावर आहे. तोवर सुनिल व मीपण बँकेत रुजू झालो होतो.
एकदा मला फोन आला " मी म्हटलो किशोर गाडीवर आहे करतो लगेच."
यावर किशोरने एका आठवड्याने फोन केला.
मी" हेलो" म्हणताच म्हणाला. " कोळेकर उतारला का गाडीवरनं औ"
असाच अनुभव सुनिलच्या बाबतीत " सुनिलही बस मधे असताना त्याचा फोन आला तर " बसमधे आहे नंतर करतो असं म्हणाला."
किशोरने काही दिवसातंच पुन्हा फोन केला.
" सुनिल औ उतारला काय बसमधून "
म्हणत त्याला प्रेमळ शिव्या घालू लागला.
मागच्याच काही दिवसांतही त्याने फोन केला.
मी उचलला. तो म्हणाला
" न्हाय तुमी फोन उचलताय का नाही हे चेक करायला फोन केलाय " त्यो सुन्या भाडखौ उचलना झालाय फोन म्हणून तुमाला केला." आम्ही खो खो हसत होतो.
इकड तिकडच्या गप्पा झाल्या."तणावाचं आयुष्यं कुठवर जगायचं राव . टारगेट व प्रेशरच्या नादात जगायचं राहून जातंय राव.
असो . . .करत जा आदनमद्नं फोन औ ठीव का." म्हणत फोन ठेवला. असा हा किशोर विसरण्यासारखा नक्कीच नाही . . . .ज्याच्यामुळे एमेस्सीचे दिवस
चैतन्यदायी गेले . .

सुविकोळेकर@

Comments

  1. Great, एकदम मार्मिक

    ReplyDelete
  2. लिहिलंय तर छानच नेहमी प्रमाणे... अगदी same डायलॉग सह... बँक वाले मित्रावर लिहीलं... जरा डिपार्टमेंट ये मे स्सी ऍनिमल चा पण शोध की एकादा to अधिक संवाद आम्हांला माहितीय... किति जुळतंय बघुयात 👍🏻

    ReplyDelete

Post a Comment